Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पोस्टाची योजना : 10 हजारांची गुंतवणूक 16 लाखापेक्षा जास्त नफा मिळणार !

 
 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
कमीत कमी गुतंवणूक आणि जास्त नफा अशा योजनेच्या शोधात प्रत्येक व्यक्ती असतो. जर तुम्हीही अशाच एखाद्या स्कीमच्या शोधात असाल, जी कमी गुंतवणुकीत जास्त नफा देऊ शकते. तसेच यात तुमचे पैसही सुरक्षित राहतील. तर मग पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट (RD) ही तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. यात गॅरंटी रिटर्न्ससह तुमचे पैसे 100 टक्के सुरक्षित राहतात. यात गुंतवणूक किमान 100 रुपयांनी खाते उघडता येते. त्याचबरोबर तुम्ही जर या योजनेत दर महिन्याला 10 हजार रुपये गुंतवले. तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 16 लाखांहून अधिक रक्कम मिळू शकते. 
रिकरिंग डिपॉझिटमध्ये दर महिना थोडीशी बचत केल्यास तुम्हाला कोट्यावधींचा निधी मिळू शकतो. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी दर महिना 100 रुपये जमा करणे गरजेचे आहे. या योजनेतील ठेवीची रक्कम 10 रुपयांच्या पटीत असावी. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे आहे. तुम्ही त्याचा कालावधी पुढे वाढवला जाऊ शकतो.

आरडी स्कीमची वैशिष्ट्ये
👉 आरडी स्कीम सिंगल आणि जॉईंट अकाऊंट अशा दोन्ही अकाऊंटवर ही सुविधा मिळते. जॉईंट अकाऊंटमध्ये अधिक जास्तीत जास्त 3 प्रौढ असू शकतात.
👉तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दहा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाच्या नावावर खाते उघडू शकता. मात्र पालकांनी ते राखणे आवश्यक आहे.
👉 आरडी स्कीमची मुदत 5 वर्ष असते. पण मुदतीपूर्वी अर्ज केल्यास ती स्कीम तुम्हाला पुढील पाच वर्षे वाढवता येते.
👉यासाठी दर महिन्याला तुम्हाला किमान 100 रुपये जमा करावे लागतात. तसेच जर दिलेल्या वेळेत ही रक्कम जमा झाली नाही तर प्रत्येक 100 रुपयांवर 1 रुपये दंड आकारला जातो.
👉यात खाते उघडण्याच्या तारखेपासून 3 वर्षांनंतर Prematurely closer ची सुविधादेखील मिळते.
👉आरडीमध्ये दिले जाणारे व्याजाचे दर तिमाही आधारावर बदलते.
👉आरडी खाते एका शाखेतून दुसर्‍या शाखेत हस्तांतरित केले जाऊ शकते.
👉जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर ही सुविधा आरडीवर देखील उपलब्ध आहे. एका वर्षानंतर आपण ठेवीच्या रकमेच्या 50 टक्केपर्यंत कर्ज घेऊ शकता.
जर गुंतवणूकदाराने 10 वर्षांसाठी दर महिना दहा हजार रुपये आरडीमध्ये जमा केले, तर त्याला दहा वर्षांनी तुमची रक्कम 12 लाख इतकी होते. त्याला दर वर्षाला 8.8 टक्के व्याज मिळतो. व्याज चक्रवाढ तिमाही आधारावर केली जाते. त्यात तुम्हाला Maturity नुसार कमीत कमी 16.28 लाख रुपये परतावा मिळतो. म्हणजेच तुम्हाला 4.28 लाखांचा फायदा होतो.  

Post a Comment

0 Comments