Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बाळ बोठेसह वकील आरोपीस व्हीआयपी ट्रीटमेन्ट का? यांची पोलिस महासंचालकानी चौकशी करावी अन्यथा आत्मदहन : रुणाल जरे



ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
रेखा जरे खूनप्रकरण : हैद्राबाद येथून अटक करून पारनेर (अहमदनगर) येथे पोलिसांनी बाळ बोठे याला आलिशान वाहनातून आणले. तसेच बोठेसह त्याच्या हैद्राबादी वकील आरोपीस व्हीआयपी ट्रीटमेन्ट का? यांची पोलिस महासंचालकानी चौकशी करावी अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा रुणाल जरे याने दिला आहे.
पारनेर पोलीस ठाण्यात आलिशान वाहनातून बाळ बोठे याला आणण्यात आले. विशेष म्हणजे तिरंगा असलेल्या फॉरचुनर गाडीतून रुबाबशीर बोठेला आणले आहे. खूनासारख्या गंभीर गुन्ह्यातील तो आरोपी असतानाही त्याला ना बेड्या ना पोलिसांचा गराडा होता. तसेच स्वतंत्र बराकीत बोठेसाठी खास व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. बोठेला उद्या (रविवारी) पारनेर न्यायालयात हजर केले जाणार आहे.



Post a Comment

0 Comments