Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भिंगार बाजारात मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोघे पकडले ; भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - भिंगार येथील आठवडे शुक्रवार बाजारात मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्य (कर्नाटक) टोळीतील पळून जाणाऱ्या दोघांना पाठलाग करून भिंगार कॅम्प पोलिसांनी पकडले रायप्पा मधुरा (वय 26 रा. कडवरा, चिकमंगलूर, कर्नाटक), रमेश प्रसाद गोडेट्टे ( वय 23 रा. तिप्पा बुटरगुंटू जि. नुल्लर, आंध्रप्रदेश) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत
याबाबत समजलेली माहिती अशी की, भिंगार शुक्रवार बाजारात पेट्रोलिंगसाठी असणाऱ्या भिंगार कॅम्प पोलिसांना मोबाईल चोरी झाल्याचे सत्तार मोहम्मद (नागरदेवळे) यांनी सांगितले. पोलिसांनी तातडीने शोध मोहीम घेऊन मोबाईल चोरटे रायप्पा मधुर, रमेश गोडेट्टे या दोघांना पाठलाग करून पकडले. पोलिसांनी चोरट्यांना खाक्या दाखवताच 55 हजार रुपयांचे 6 मोबाईल काढून दिले. दोघे चोरटे गर्दीच्या ठिकाणी जाऊन हातचलाखीने मोबाईल व इतर महागड्या वस्तू चोरणे, चारचाकी गाडीच्या काचा फोडून त्यातील मोबाईल व इतर महागड्या वस्तू चोरण्याची त्याची पद्धत होती.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्पचे सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्या सूचनेनुसार पोसई एम. के.  बेंडकोळी, पोहेकाँ जी.डी. गोल्हार, पोना राहुल द्वारके, राजेंद्र सुद्रिक, भानुदास खेडकर, पोकाँ समीर शेख, एस.बी तावरे, अमोल आव्हाड, चोपोकाॅ अरुण मोरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments