Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सॅटर्डे क्लब संगमनेरचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा ; कर सल्लागार सागर हासे यांची अध्यक्षपदी तर डॉ. सागर गोपाळे यांची सेक्रेटरीपदी निवड

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
संगमनेर - महाराष्ट्रीयन उद्योजकांना हक्काचे व्यासपीठ भेटावे तसेच त्यांच्या व्यवसायात वृद्धी व्हावी या हेतुने स्वत: अभियंता असलेल्या कै. माधवराव भिडे यांनी नाशिकमधुन सुरु केलेला सॅटर्डे क्लब आज संगमनेर सह दोनशे चाळीस शहरांमध्ये हा क्लब उद्योजकांना मार्गदर्शनाबरोबरच व्यवसायवृद्धीत मदत करत आहे. गुरुवार 4 मार्च रोजी संगमनेर शाखेचा तिसरा वर्धापण दिन व नुतन अध्यक्ष, सेक्रेटरी व खजिनदार यांच्या निवडीचा कार्यक्रम हॉटेल मयुर एक्सप्रेस येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सॅटर्डे क्लब मुख्य कार्यालय सेक्रेटरी जनरल प्रदीप मांजरेकर, नाशिक व अहमदनगर रिजनल हेड अमोल कासार, महिला आघाडी प्रमुख मानसी मांजरेकर, युवा उद्योजक आघाडीच्या प्रमुख रुपाली ठाकूर आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी नुतन वर्षासाठी अध्यक्ष म्हणून प्रतिथयश कर सल्लागार सागर हासे, सेक्रेटरी म्हणून विख्यात दंत चिकित्सक डॉक्टर सागरजी गोपाळे तर युवा उद्योजक मयुर पवार यांची खजिनदार म्हणून निवड करण्यात आली.
कोरोनाच्या अतिशय अवघड काळातही संगमनेर सॅटर्डे क्लबमार्फत घेण्यात आले ऑनलाईन व्याख्याने ही चर्चेचा विषय ठरली होती. याच काळात क्लब मेंबरची संख्या साठच्याही पुढे जाऊन तालुकास्तरावर एक विक्रम प्रस्थापित झाला होते. गेल्या चार महिन्यांत क्लब सदस्यांकडून एकमेकांची 85 लाख रुपयांची कामे करण्यात आली. हीच उद्योगउर्जा पुढे सुरु ठेवण्याचा एक प्रयत्न म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला. क्लबचे माजी सेक्रेटरी विजय ताजणे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले, क्लबचे माजी चेअरमन प्रमोदजी देशमुख यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कार्याचा आढावा घेतला तर माजी खजिनदार प्रल्हाद देशमुख यांनी मागील कार्यकालात क्लब सदस्यांकडून करण्यात आलेल्या व्यवसायाचा लेखाजोखा मांडला. क्लबचे नुतन सेक्रेटरी डॉक्टर सागर गोपाळे यांनी येत्या काळात क्लबतर्फे राबविण्यात येणाऱ्या योजना व उपक्रमांविषयी माहिती दिली.
मुख्य कार्यालय सेक्रेटरी जनरल प्रदीप मांजरेकर यांनी पुढील काळात संगमनेर सॅटर्डे क्लबकडून असलेल्या अपेक्षा तसेच त्या पुर्ण करण्यासाठी कुठल्या पद्धतीने काम करावे लागेल याविषयी मार्गदर्शन केले. रिजनल हेड अमोल कासार यांनी संगमनेर क्लब सदस्यांचे कौतुक करत अतिशय प्रतिकुल काळातही क्लब सुरु ठेवून केलेल्या कामाचे कौतुक केले व क्लबचे काम कुठल्याही जिल्हास्तरावरील क्लबपेक्षा कमी नाही असे सांगितले.
कार्यक्रमाचा समारोप नुतन अध्यक्ष सागरजी हासे यांनी आभारप्रदर्शन करुन केले. यावेळी त्यांनी जुन्या कार्यकारिणीचे आभार मानले. तसेच संगमनेर तालुक्यातील उद्योजक, क्लब सदस्य, कोअर टीम सदस्य तसेच बाहेरुन आलेल्या 15 उद्योजकांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोहीत मंडलिक, महेश ढोले, आनंद हासे, अमर भावसार, अतुल कोटकर, स्वाती विखे यांसह इतर क्लब सदस्यांनी सहकार्य केले. क्लब सदस्य संज्योत वैद्य यांनी राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.

Post a Comment

0 Comments