Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रस्ता लुटीतील चोरटे अटक ; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी



ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - रस्तालुट या दाखल गुन्ह्यातील चोरटे जेरबंद करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. संदीप दिलीप कदम (वय 25, रा. डोंगरगण जि.ता अहमदनगर), शशिकांत सावता चव्हाण (वय 29 रा, आंबी जळगाव ता. कर्जत जि. अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. 4 मार्च रोजी औरंगाबाद महामार्गावरील शेंडी शिवारातील जबरी चोरी प्रकरणाच्या दाखल गुन्ह्यातील चोरटे शेंडीचौकात येणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि युवराज आठरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलिस पथकाला सूचना देऊन संदीप कदम व शशिकांत चव्हाण या दोघा चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले. या दोघांची अधिक चौकशी केली असता, त्यांच्याकडे गुन्ह्यातील मुद्देमाल व गुन्ह्यात वापरण्यात आलेली पल्सर दुचाकी व कोयता मिळून आला. दोघांना पोलिस खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणातील फरार चोरट्याचा पोलिस शोध घेत असून पुढील तपास पोउप निरीक्षक एस एन कणसे हे करीत आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि युवराज आठरे यांच्या सूचनेनुसार पोउनि सदाशिव कणसे, पोना महेश दाताळ, शब्बीर शेख, युवराज गिरवले, संदीप खेंगट, पोशि जयसिंग शिंदे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

            Post a Comment

            0 Comments