Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

फरार आरोपी जेरबंद ; भिंगार कॅम्प पोलिसांची कामगिरी

  

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे एक वर्षापासून फरार असणारा आरोपी याला जेरबंद करण्यात भिंगार कॅम्प पोलिसांना यश आले आहे. स्वप्निल विजय ढलपे ( रा.चेतना काॅलनी, एमआयडीसी, अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, मयत झालेल्यास वेळोवेळी दमदाटी करून त्याच्या पत्नीचे स्वप्निल ढलपे याच्यासोबत असलेले अनैतिक संबंधाच्या कारणातून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या दाखल फिर्यादीवरून स्वप्निल ढलपे याच्याविरूद्ध भादविक 306, 34 प्रमाणे भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी ढलपे हा माळीवाडा बसस्थानक येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी ढलपे याला पकडले. 
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्या सूचनेनुसार पोसई एम.के.बेंडकोळी, पोना भानुदास खेडकर, राजेंद्र सुद्रीक, राहुल द्वारके, संतोष आडसूळ, पोकाँ रमेश दरेकर, संजय काळे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments