Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दंगा करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी भिंगार कॅम्पाला गुन्हा दाखलऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- दंगा करून शांततेचा भंग केल्यासह अन्य कलमान्वये सातजणांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, तू आमच्या धंद्यात बदनामी का करतो, तुमची आमची काही दुश्मनी आहे काय असे म्हणाले, असता त्यांना समजावून सांगत असताना त्यांना राग येऊन त्यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. फरशी पुसण्याच्या स्टीलच्या दांडक्याने मारहाण करून उजवे हातास दुखापत केली, तसेच ऑफिसमधील खुर्चीची तोडफोड करून नुकसान केली, या विष्णू गणपत चेमटे (भैरवनाथ रोड लायन्स ट्रान्सपोर्ट रा.गुगळ काॅलनी, बु-हाणनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामा पोकळे (रा.दादेगाव, ता.आष्टी, जि.बीड), प्रसाद बाबर (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही), पोकळे याचा मावस भाऊ (नाव,पत्ता माहिती नाही) यासह अन्य चार ते पाचजणांवर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुरनं १०१/२०२१ भादंवि कलम ३८४, ३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४९,४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोहेकाॅ जी.जी.गोर्डे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments