Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपींचा मेळावा ; सुधारणा व्हावी, अन्यथा कारवाई- सपोनि युवराज आठरे

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर- जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार टु प्लस योजनेच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील आरोपींचा सपोनि युवराज आठरे यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.24) मेळावा घेण्यात आला. यावेळी मेळाव्यात निवेदक उद्धव काळापहाड यांनी प्रबोधन केले.

मेळाव्या दरम्यान, गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये सुधारणा व्हावी, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देत नगर एमआयडीसी पोलिस ठाण्यात उपस्थित असणा-या आरोपींचे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि आठरे यांनी प्रबोधन केले. यावेळी पोउपनि सदाशिव कणसे यांच्यासह एमआयडीसी पोलिस ठाण्याचा कर्मचारी वर्ग आणि गावांचे पोलिस पाटील उपस्थित होता. या मेळाव्या दरम्यान उपस्थित आरोपींना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी निवेदक उद्धव काळापहाड यांनी शिवरायांच्या काळातील उदाहरणे दिली. यावेळी एमआयडीसी पोलिस ठाण्यातील उपस्थित असणा-या आरोपींकडून यापूर्वी असणा-या दाखल गुन्ह्यांची माहिती अर्जात भरून घेण्यात आली. यावेळी एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील 40 ते 50 आरोपी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments