Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अखिल भारतीय संत भगवान बाबा सेवा संघाच्या पाथर्डी तालुका कार्याध्यक्षपदी राजेंद्र बारगजे

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी- अखिल भारतीय संत भगवान बाबा सेवा संघाच्या पाथर्डी तालुका कार्याध्यक्षपदी राजेंद्र दादासाहेब बारगजे यांची संघाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत चेमटे यांनी नुकतीच निवड केली असून, नियुक्तीचे पञ श्री बारगजे यांना दिले आहे. 
अखिल भारतीय संत भगवान बाबा सेवा संघाचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारत आहे. समाजातील तळागाळातील नागरिकांना मदत करून अन्याय झाल्यास मदत करणे. यासह छोट्या मोठ्या उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करणे, समाजाचे संघटन करण्यासारखे समाज हिताचे काम संघाच्या माध्यमातून केले जात आहे. 
राजेंद्र बारगजे यांची संघाच्या पाथर्डी तालुका कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पाथर्डी तालुक्यातून श्री बारगजे यांचे अभिनंदन केले जात आहे.




Post a Comment

0 Comments