Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेतकऱ्यांना आता पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेतानाच किसान क्रेडिट कार्ड व पीएम किसान मानधन योजनेचा लाभ मिळणार !

 


'किसान क्रेडिट कार्ड' मिळविण्यासाठी
 बँकांची फी रद्द
नवीदिल्ली : शेतकऱ्यांना आता पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेतानाच किसान क्रेडिट कार्ड व पीएम किसान मानधन योजनेचा लाभ मिळणार आहे. याप्रमाणे केंद्र सरकार एप्रिल महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 8 व्या हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे. ही हप्त्याची रक्कम 10 एप्रिल पर्यंत पाठवण्याची नियोजन केंद्र सरकारचे आहे. पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड व पीएम किसान मानधन योजना या दोन्हीही योजनांचा लाभ शेतक-यांना घेता येणार आहे.

👉'किसान क्रेडिट कार्ड' कर्ज मिळणे सोपे - पीएम किसान सन्मान योजना व किसान क्रेडिट कार्ड लिंक करण्यात आलं आहे. दि.24 फेब्रुवारी 2019 ला यासंदर्भात निर्णय घेऊन नियोजन करण्यात आले आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावं यासाठीच 'किसान क्रेडिट कार्ड' माध्यमातून शेतक-यांना कर्ज घेण्यासाठी प्रक्रिया सोपी व सरळ करण्यात आली आहे. 'किसान क्रेडिट कार्ड' मिळविण्यासाठी बँकांची फी रद्द करण्यात आली आहे. क्रेडिट कार्डला पंतप्रधान किसान निधीला जोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांना बिनव्याजी एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज देण्यात येईल वर्षभरातचं त्याची परतफेड करावी लागणार आहे. किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज 9 टक्के व्याजानं मिळतं. केंद्र सरकार यावर 2 टक्के सूट देते. वेळेत कर्ज फेड केल्यास 3 टक्के आणखी सूट मिळते. शेतकऱ्यांना या प्रकारे किसान क्रेडिट कार्डद्वारे 4 टक्के व्याजदरानं कर्ज मिळतं. देशात किसान क्रेडिट कार्डचा वापर 8 कोटी शेतकरी करतात.


👉पीएम किसान मानधन योजना 
पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घेता येतो. केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांची सर्व माहिती असते. त्यामुळे वेगळी कागदपत्रं जमा करावी लागत नाहीत. किसान सन्मान योजनेच्या मिळणाऱ्या 6 हजार रुपयांमधूनचं किसान मानधन योजनेचा प्रीमियम कापला जातो. ही प्रक्रिया सुरु राहिल्यास शेतकरी पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतात.


👉पंतप्रधान शेतकरी सन्मान 
     निधी योजना काय आहे ?
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 6 व्या हप्त्याची रक्कम दि.25 डिसेंबर 2020 पासून मिळण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये जमा केले जातात. आतापर्यंत 9 कोटी 41 लाख शेतकऱ्यांना 7वा हप्ता मिळाला आहे. या योजनेमध्ये पहिला हप्ता हा दि.1 डिसेंबर 31 ते मार्च या कालावधीत दिला जातो. दुसरा हप्ता दि.1 एप्रिल ते 31 जुलैच्या कालावधीत दिला जातो. शेतकऱ्यांना खात्यात 3 रा हप्त्या हा दि. 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर पर्यंत देण्याचे केंद्र सरकारचे नियोजन असतं.


Post a Comment

0 Comments