Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

'संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना' ; नामकरण ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमतानेऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी- केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना नामकरण करण्याचा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला आहे.
केदारेश्वरने हाती घेतला इथेलॉन व डिस्लरी प्रकल्प लवकरच मार्गी लावण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन प्रतिपादन केदारेश्वर अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांनी व्यक्त केले.

बोधेगाव येथील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन मंगळवारी सकाळी कारखानास्थळावर संपन्न झाली. प्रारंभी अहवाल सालात मृत्यू मुखी पडलेल्या कारखान्याचे सभासद व विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, दिलीप गांधी, अहमद पटेल, अनिल कराळे, भाऊसाहेब बर्डे, सर्जेराव झुंबड, आदींना श्रद्धांजली अर्पण केली तर प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे यांनी अहवाल वाचन केले.

यावेळी बोलताना अध्यक्ष प्रतापराव ढाकणे म्हणाले चालू गळीत हंगाम अत्यंत खडतर मार्गातून सर्वांच्या सहकार्यातून सुरू आहे आज पर्यंत तीन लाख साखर उत्पादन झाले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३१ जानेवारी अखेर तर कामगार व ऊसतोडणी कामगार वाहतूकदारांचे नियमित पेमेंट अदा केले आहे.
पाणी साठ्यात वाढ झाल्याने यंदा ऊस लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. पुढील हंगामात केदारेश्वरच्या कार्यक्षेत्रात मोठा ऊस उपलब्ध असल्याने गाळपाचे मोठे अहवान आहे. शेतकऱ्यांना उसाला चांगला दर मिळण्यासाठी साखरेबरोबर इथेलॉन व डिस्टलरी प्रकल्पाचे काम हाती घेऊन तातडीने प्रकल्प कार्यन्वित करण्यासाठी संचालक मंडळाच्या प्रयत्न आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यास मोठी मदत होणार आहे, राजकारण विरहित सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे, सभासदांच्या हितासाठी खत, बी-बियाणे, उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. तर काही दिवसांपूर्वी गारपिटीमुळे शेतकरी संकटात सापडला गेला केदारेश्वरच्या माध्यमातून सभासद असणाऱ्या कुटुंबाला चार हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे जिल्ह्यात बागायतगार कारखाने समजणाऱ्यानी अडचणीत शेतकऱ्यांना का मदत केली नाही, असा सवाल श्री ढाकणे यांनी व्यक्त केला 
यावेळी कारखान्याचे संस्थापक माजीमंत्री बबनराव ढाकणे यांनी ऑनलाइन सहभाग घेऊन म्हणाले संचालक मंडळाने अत्यंत अडचणीत उसाचे वेळेवर गाळप केले त्याबद्दल संचालक मंडळ व अधिकाऱ्यांनी अडचणीत चांगले काम केल्याबद्दल अभिनंदन करून धन्यवाद दिले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनीकुमार घोळवे, संचालक तुषार वैद्य, सुरेशचंद्र होळकर, बापूराव घोडके, माधव काटे, तज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे,माजी कार्यकारी संचालक नारायण खेडकर यांनी मनोगत व्यक्त केले. सभासद प्रमोद विखे यांनी ऑनलाइन सहभाग घेऊन कारखान्यास संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे नामकरण करण्याची सूचना केली त्यास सर्वानुमते वार्षिक सभेत संमती दिली आहे.
यावेळी जेष्ठ संचालक भाऊसाहेब मुंडे, त्रिंबक चेमटे, विठ्ठल अभंग, सतिश गव्हाणे, रणजित घुगे, सुभाष खंडागळे, शेषेराव बटुळे, भागीनाथ सिरसाट, मीना बोडखे, मधुकर गोरे, संदीप बोडखे, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष भागवत, मुख्य अकाउंट विभागाचे तीर्थराज घुंगरट, चीफ केमिष्ट किसन गर्जे,शेतकी विभागाचे अभिमन्यू विखे, यांच्यासह संचालक व सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते 
प्रास्ताविक शरद सोनवणे यांनी केले. आभार उपाध्यक्ष डॉ प्रकाश घनवट यांनी मानले.
--------------------------- 
संकलन- बाळासाहेब खेडकर

Post a Comment

0 Comments