Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दारुड्या बापाने केला मुलाचा खून ; शेवगाव तालुक्यातील आखेगावातील घटना

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - दारूच्या आहारी गेलेल्या बापाने आपल्या पोटच्या मुलाचा खून केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामधील आखेगाव या गावात मंगळवारी (दि.30) पहाटच्या सुमारास घडली. पत्नी ताराबाई हिने पती गोरख याच्याविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 
याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव तालुक्यातील आखेगाव या गावातील गोरख किसन करपे या दारुड्या बापाने बारावीत शिकत असलेल्या सोमनाथ गोरख करपे (वय 18) या पोटच्या मुलाचा लोखंडी गजाने मंगळवारी (दि. 30) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास शेतात ऊसाला पाणी देत असताना हत्या केली. पत्नी ताराबाई यांनी दारुडा पती गोरख याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गोरख करपे हा खूप दारूच्या व्यसनाधीन झालेला आहे. त्यामुळे घरात नेहमी किरकोळ वाद होत होतात. सोमवार (दि.29) गोरख हा दारू पिऊन घरी आला. यावेळी पत्नी ताराबाई या सायंकाळी शेतातून घरी आल्यात, यानंतर आज होळीचा सण असूनही तुम्ही सणासुदीची दारू का पिऊन आलात असे विचारले, त्यावर रागावलेला पती गोरख याने पत्नी ताराबाई हिला मारण्यासाठी पुढे आला, परंतु यावेळी मुलगा सोमनाथ हा मधी आल्याने ताराबाई यांचा मार वाचला. यावेळी दारुड्या गोरख याला मुलगा सोमनाथ याने शिव्या दिल्या व तो घरातून निघून गेला. त्यानंतर ताराबाई व मुलगा सोमनाथ हे दोघे जेवण करून रात्री 10 वाजण्याच्या सुमारास गट नंबर 324 या त्यांच्या शेतामधील ऊसाला पाणी देण्यासाठी गेले होते. त्यांच्याबरोबर ताराबाई यांची जाव मुक्ता भाऊसाहेब करपे या त्यांच्या पिकास पाणी देण्यासाठी आल्या होत्या, तर मयत मुलगा सोमनाथ याची आई ताराबाई उसाच्या शेवटच्या टोकाला पाणी पोहोचल्याचे त्याला (सोमनाथ) आवाज देऊन सांगत होती. यावेळी मुलगा सोमनाथ व आई ताराबाई यांच्या दोघांमध्ये 100 फुटाचे अंतर होते. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सुमाराला सोमनाथ याचा ओरडल्याचा आवाज आल्याने आई ताराबाई पळत मुलगा सोमनाथ यांच्याकडे गेल्या असता, यावेळी गोरख (बाप) हा मुलगा सोमनाथ याच्या डोक्यावर लोखंडी गजाने मारत असल्याने आई ताराबाई हिने पाहिले.
यावेळी मुलगा सोमनाथ हा बांधावर खाली पडला. या मारहाणीमध्ये मुलगा सोमनाथ हा गंभीर जखमी झाला. त्यावेळी मुलगा सोमनाथ याच्या डोक्यातून रक्त येत होते. ही घटना शेजारच्या शेतात पाणी देणाऱ्या मुक्ता करपे, अंबादास जाधव, सतीश पायघन यांना समजतात ती सर्वजण घटनास्थळी पोहोचले. जखमी सोमनाथ याला नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्या उपचारादरम्यान मुलगा सोमनाथ याचा मृत्यू झाला. मृत्यू सोमनाथ यांची आई ताराबाई हीने दारूडा पती गोरख याच्याविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुजित ठाकरे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments