Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बोधेगाव लाडजळगाव परिसरात गारांचा पाऊस

 

नलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
शेवगाव - अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्यासह पूर्व भागातील लाडजळगाव गोळेगाव, शेकटे बोधेगाव ,कोरडगाव, तसेच पाथर्डी तालुक्यातील साकेगाव, पागोरी पिंपळगाव , खेर्डे, आणि पंचक्रोशीत शनिवार वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. पर्जंन्य वृष्टी सुरु असतानाच प्रचंड गारांचा वर्षाव झाला आहे.क्षणार्धात सर्व परिसर पांढरा शुभ्र गारमय झाला होता.सगळीकडे पाणीच पाणी झाले.

अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला खरा परंतु बळीराजावर अचानक आस्मानी संकट कोसाळल्यामुळे आणि हाती आलेला घास निसर्गाने हिराऊन घेतल्यामुळे बळीराजा अत्यंत चिंताग्रस्त झाला आहे.शेतातील काढणीला आलेला गहु,हरभरा,मका,तसेच ऊन्हाळी पिके बाजरी भूईमुग ,कांदा, टरबूज -खरबूज या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्‍याला वर्षभर कोरोनाने छळले आणि आता हाता —तोंडाशी आलेला घास अस्ममानी संकटाने हिराऊन नेला .शेतकर्‍यांनी कर्ज काढुन आपल्या शेतीत गहु, हरभरा, मका, बाजरी कांदा तसेच आंबा पिकाचा मोहोर लागलेले फळ गळून गेले व फळबागांचे पिके घेतली होती .ती सर्व पिके भूईसपाट झाली त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.आई खाऊ देईना व बाप भिक मागु देईना अशी स्थिती शेतकर्‍याची झाली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे त्यामुळे शासनाने तात्काळ सरसकट पंचनामे करुन नुकसान भरपाई सर्व शेतर्‍यांना दिली पाहिजे अशी मागणी लाडजळगाव येथील प्रगतशिल शेतकरी भागवतराव तहकिक यांनी केली आहे.
संकलन -बाळासाहेब खेडकर 

Post a Comment

0 Comments