Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिर्डीत साई मंदिराच्या होळीचे पूजन

 ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
शिर्डी - शिर्डी येथे दरवर्षाप्रमाणे होळी पेटवून तिचे पूजन केले जाते या वर्षीही कोरोणाच्या अटी व शर्ती राखत श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी च्या वतीने श्री गुरुस्थान मंदिरासमोर पेटवण्यात आलेल्या होळीचे पूजन साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ संगीता बगाटे यांच्या हस्ते करण्यात आले. 
यावेळी साई संस्थांनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, सौ वैशाली ठाकरे तसेच श्री साईबाबांचे मंदिर प्रमुख रमेश चौधरी, मंदिरातील कर्मचारी, पुजारी व साईभक्त ही यावेळी उपस्थित होते ,मात्र यावेळी मोजक्याच लोकांनी कोरोणाच्या अटी व शर्ती राखत हे होळी पूजन केले, श्री साईबाबांच्या गुरुस्थान मंदिरासमोर ही होलिकापूजन विधिवत पणे पूजाअर्चा करून करण्यात आले.

Post a Comment

0 Comments