Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

डोंगरपट्ट्यातील कारखान्यांनी ऊस न नेल्याने शेतक-याचे मोठे नुकसान

 


ऊस पेटविण्याचा शेतकऱ्याचा इशारा ; कारखाना ऊस तोडत नसल्याने शेतकरी हैराण
ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर/ व्हिडिओ 
पाथर्डी : कारखान्याने पुढील दोन दिवसात डोंगरपट्ट्यातील ऊस न तोडल्यास ऊभा ऊस पेटवून देऊ, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. पाथर्डी तालुक्यातील चिचंपूर पांगुळ गावातील शेतकरी केशव केदार यांनी आपला ऊस कारखाना तोडत नसल्याने हतबल होऊन हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
चिंचपूर पांगुळ गावातील शेतकरी केशव केदार यांनी सर्वेनंबर 174-1 मध्ये ऊसाची लागवड केलेली आहे. त्यास आता दीड वर्षाचा कालावधी उलटला आहे. मात्र, ऊस तोडला जात नाही. त्यात विहिरीला पाणी कमी पडल्याने ऊस वाळत आहे.
केदार हे वृद्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे सभासद असून देखील कारखाना ऊस तोडण्यास टाळाटाळ करत आहे. सुमारे दीड वर्षाचा झालेला ऊस आता पाण्याआभावी वाळत आहे.
कारखान्याकडून मागील काही काळापासून ऊस तोडण्याचे फक्त आश्वासन दिले जात आहे. मात्र, कारखाना नियमाप्रमाणे ऊस तोड करत नसून गावातील कमी कालावधीचे अनेक ऊस तोडले, असल्याचा आरोप देखील केदार यांनी केला आहे.
कारखान्याचा प्रतिनिधी आणि टोळीचा प्रमुख हे संगनमत करुन जो पैसे देईल त्याच्या ऊसाची तोडणी करत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे ऊस दीड वर्षापेक्षा जास्त कालावधीचे झाले आहेत. मात्र तोडले जात नसल्याच्या प्रतिक्रिया शेतक-यांनी दिल्या आहेत.

👉"माझा ऊस दीड वर्षाचा झाला आहे. सध्या पाणी नसल्याने तो वाळलत आहे. मात्र, कारखान्याचा प्रतिनिधी आणि टोळी प्रमुख मुद्दाम ऊस तोडत नाहीत. परिणामी उभा ऊस पेटवून देण्याशिवाय पर्याय नाही."
केशव केदार, शेतकरीPost a Comment

0 Comments