Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रस्ता लुटीतील चोरटे जेरबंद ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - औरंगाबाद महामार्गावर शेंडी शिवारातील जबरी चोरीतील दोन चोरटे मुद्देमालासह पकडण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. संदीप दिलीप कदम (वय 25 रा. डोंगरगण ता जि अहमदनगर), शशिकांत सावंत चव्हाण (वय 22 रा.आंबीजळगाव ता. कर्जत जि. अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल जबरी चोरीच्या दाखल गुन्ह्यातील चोरटे हे शेंडी चौक येथे येणार असल्याची माहिती सपोनि युवराज आठरे यांना मिळाली. त्या माहितीनुसार श्री आठरे यांनी पथकाला सूचना दिल्या. पोलिसांनी तात्काळ सापळा लावून संदीप कदम, शशिकांत चव्हाण या दोघा चोरट्यांना पकडले. यावेळी गुन्ह्यात वापरण्यात आलेली पल्सर दुचाकी, कोयता मिळून आला. त्याना पोलीस खाक्या दाखविताच सदरचा गुन्हा केल्याची कबुली त्यानी दिली. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. 
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि युवराज आठरे यांच्या सूचनेनुसार पोउपनि सदाशिव कणसे, पोना महेश दाताळ, शाब्बीर शेख, पोहेकाँ युवराज गिरवले, संदीप खेंगट, पोशि जयसिंग शिंदे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments