Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्ह्यात गुन्हेगारी कमी करण्यासाठीच टू प्लस योजना : एसपी मनोज पाटील

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर- नगर जिल्ह्यातील अडीच हजाराच्या आसपास गुन्हेगारांवर मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. या याद्या तयार करून त्या गुन्हेगारांवर यापूर्वी काय कारवाई केली आहे. जामिनावर बाहेर कोणत्या कारणास्तव आलेले आहेत. ही सर्व माहिती संकलित करण्याचे काम झालेले आहे. या सर्व गुन्हेगारांना बोलून मार्गदर्शन करून योग्य ती समज दिली जात आहे. यानंतर गुन्हा केल्यास कठोर कारवाई केली जाईल, अशी तंबी देऊन त्याचे वर्तनात चांगली सुधारणा झाल्यास त्याचा फायदा निश्चितच त्यांना होईल, असेही जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी म्हटले आहे.
गुन्हेगारांच्या गुन्ह्यांची संपूर्ण माहिती संकलन केल्यामुळे पुढील कारवाईसाठी पोलिसांना त्याचा निश्चित फायदा होईल. पाटील पोलीस, नागरिकांना परिसरातील गुन्हेगारांची माहिती असल्यास यामुळे गुन्हेगारी रोखण्यामध्ये या सर्व घटकांची पोलिसांना मदत होईल. या हेतुने टू प्लस योजनेच्या माध्यमातून भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हेगारांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी सर्व उपस्थित गुन्हेगारांना मार्गदर्शन करून पोलिसांकडून त्यांना योग्य ती समज देण्यात आली आहे. नगर जिल्ह्यात टू प्लस योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यात गुन्हेगारांची मेळावे घेतले जात आहेत आहेत, असे एसपी पाटील यांनी म्हटले.

एसपी मनोज पाटील यांची 'वाल्याचा वाल्मिकी' करण्यासाठी टू प्लस योजना : विशाल ढुमे 
टू प्लस योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील गुन्हेगारांना 'वाल्याचा वाल्मिकी' करण्याचा जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचा हेतू आहे, हा हेतू साध्य करण्यासाठी त्यांच्या सूचनेनुसार आम्ही सर्व पोलीस अधिकारी व पोलिस कर्मचारी योग्य ती कार्यवाही करीत असल्याची माहिती नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांनी दिली.

भिंगार पोलीस ठाणे हद्दीमध्ये दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या सर्व टू प्लस योजनेच्या माध्यमातून आरोपींचा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात आला असल्याचे माहिती भिंगार कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी दिली. 


👉अहमदनगर जिल्हा क्राईममध्ये नंबर एक
महाराष्ट्रात गुन्हेगारीमध्ये अहमदनगर जिल्हा एक नंबरचा असल्याने गुन्हेगारी कमी करण्याच्या हेतूने टू प्लस योजनेच्या माध्यमातून गुन्हेगारास आळा घालण्याच्या प्रयत्न आहे, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पञकारांशी बोलताना सांगितले 
टू प्लस योजनेतून मालमत्तेच्या संबंधित व व्यावसायिक गुन्हेगाराला आळा बसेल. नगर जिल्ह्यात मालमत्तेसंदर्भात 1 हजार 885 गुन्हे असून बॉडी क्रिमिनलचे 1 हजार 665 गुन्हे दाखल आहेत. टू प्लस योजनेच्या माध्यमातून तडीपारी अथवा मोक्कांतर्गत कारवाई करण्यास पोलिसांना फायदा होईल. गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यासाठी विशिष्ट सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती असून या जिल्ह्यास सात जिल्ह्याच्या हद्दी लागून आहेत. यामुळे रोड व रेल्वे नेटवर्क मोठे आहे. नगर जिल्ह्यात दोनशे गुन्हेगारी टोळ्या आहेत, असे श्री पाटील म्हणाले.

👉'अर्ज न घेता फिर्याद घ्या' या जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशामुळे जिल्ह्यातील 24 पोलिस ठाण्यात एकही अर्ज नाही लेट गुन्हे दाखल करण्याऱ्या नगर जिल्ह्यातील 18 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडून कारवाई झाली आहे

Post a Comment

0 Comments