Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

श्री क्षेत्र धरमपुरीत श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
 अहमदनगर - प्रतिशेगांव समजल्याजाणार्‍या नगरतालुक्यातील इसळक निंबळक येथील श्री क्षेत्र धरमपुरीत श्री संत गजानन महाराजांचा प्रकटदिन साध्या पद्धतीने पण शासकीय नियम पाळून भाविकांनी उत्साहात साजरा केला.
     पहाटे श्रींच्या मूर्तीस रुद्राभिषेक करण्यात आला. मोजक्याच भाविकांनी तीन दिवस केलेल्या पारायण सोहळ्याची सांगता झाली. प्रथा म्हणून 10 ते 15भाविकांनी पालखी प्रदक्षिणा घालून मंदिर परिसरातून छोटी  मिरवणूक काढली.
  याप्रसंगी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर डॉ.महेश मुळे यांनी भाविकांना कोरोनाला घाबरु नका पणशासनाने दिलेले नियम आवश्य पाळा. लस आली तरी कोरोनाचे गांभिर्य लक्षात ठेवा. मास्क, सॅनिटायझर, स्वच्छता पाळाव प्रतिकार शक्ती वाढेल असा आहार घ्या, असे आपल्या व्याख्यानातून सांगितले. भाविकांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. गर्दी टाळण्यासाठी यावर्षी महाप्रसादाची जेवणावळी न ठेवता फक्त बुंदीचा प्रसाद वाटप करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीक्षेत्र धरमपुरी भक्तवृंदांनी विशेष परिश्रम घेतले.भाविकांनी स्वत:हून सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments