Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वाॅरंटमध्ये फरार असणारा चोरटा जेरबंद ; एलसीबीची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - चोरीच्या गुन्ह्यातील चोरटा गेल्या दहा वर्षापासून वॉरंटमध्ये फरार असणाऱ्या आरोपीस पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. दीपक मारुती जाधव (वय 37 रा. गजराजनगर, अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, 2010 मध्ये एमआयडिसी परिसरामध्ये साईबन रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या आयशर टेम्पोचे टायर चोरून नेल्याबाबत दीपक जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. सदरच्या गुन्ह्यात आरोपी जाधव याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला जामिनावर मुक्त केले होते. तेव्हापासून आरोपी जाधव हा फरार झालेला होता. आरोपी जाधव याचा शोध त्याला घेऊन हजर करण्याबाबत अहमदनगर न्यायालयाने पोलिसांना आदेश दिले होते. या न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई गणेश इंगळे, सफौ नानेकर, पोहेकाँ संदीप घोडके, पोना संदीप पवार, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, कमलेश पाथरूट, योगेश सातपुते आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments