Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा अटक ; नगर तालुका पोलिसांची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून फरार असणाऱ्या आरोपीस सोलापूर जिल्ह्यातून अटक करून आणण्यात नगर तालुका पोलिसांना यश आले आहे. भाऊसाहेब बाळू माळी (रा. चिचोंडी पाटील ता. जि. अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून फरार भाऊसाहेब माळी याच्याविरुद्ध दाखल फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात दि. 20 मार्चला कलम 376 (2)(l) पोक्स अधिनियम क्र. 3,4, 7,9 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. यानंतर आरोपी माळी हा फरार झाला होता. या फरार आरोपीचा पोलिसांनी 4 दिवसांपासून कर्जत तालुका, तालुका करमाळा (जि. सोलापूर) येथे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शोध घेतला. बुधवार (दि. 24) आरोपी हा दिवेगव्हाण (ता. करमाळा जि. सोलापूर) येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नगर तालुका पोलिसांचे पथक त्या ठिकाणी पोहचवून आरोपी माळी याला पकडले.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोउपनि डि.आर. जारवाल, पोहेकॉ बापूसाहेब फोलाणे,पोना अशोक मरकड, सचिन वनवे, बाळू कदम, पोकाँ सोमनाथ घावटे, पोना रवी सोनटक्के, दीपक शिंदे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments