Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चौघांशी पळली, पण विवाह कुणाशी ; पंचांनी अखेर चिठ्ठी सोडतीतून काढला मार्ग

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
उत्तरप्रदेश :  एक मुलगी पळून गेली चौघांबरोबर परंतु विवाह कोणाशी करायचा याबाबत स्वतःच ती संभ्रमित होती. अखेर मुलीच्या लग्नासाठी पंचायत बसून, पंचांनी चिठ्ठी टाकून निर्णय घेण्याची घटना उत्तरप्रदेशाच्या आंबेडकरनगर येथील तांडा परिसरात कोतवाली टांडाच्या अजीमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, मुलगी ही चार मुलांबरोबर पळून गेली होती. पंरतु या दरम्यान मुलगी स्वत: च ठरवू शकली नाही की तिला कोणत्या मुलाबरोबर लग्न करायचं आहे. कोण जास्त आवडतो अथवा कोणाशी लग्न करावे, याबाबत ती मुलगीच संभ्रमावस्थेत होती. पंचांनी चिठ्ठी टाकून नवरदेवाची निवड केलीय. पाच दिवसांपूर्वी या चारही तरुणांनी या मुलीला घराबाहेर नेले. आरोपींनी त्या मुलीला दोन दिवस नातेवाईकांकडे लपवून ठेवले, परंतु ते तपासात उघडे पडले. मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली, पण पंचायतीने लग्नाचा प्रस्ताव ठेवला. जेव्हा मुलीला विचारण्यात आले, तेव्हा ती आपला जीवनसाथी कोणाला निवडायचं हे ठरवू शकली नाही.


मुलेही कोणीही तिच्याबरोबर विवाह करण्यास तयार नव्हते. शेवटी या प्रकरणामध्ये कोणताही मार्ग निघत नसल्याने पंचांनी बंद खोलीमध्ये या घटनेवर तीन दिवस चर्चा केल्यावर पंचांच्या पंचायतीने निर्णय घेतला की, आता मुलीबरोबर कोण विवाह करेल याबाबत फक्त एक चिठ्ठी टाकूनच निर्णय घ्यावा. यानंतर चारही तरुणांच्या नावाची चिठ्ठी टाकण्यात आली. या चिठ्ठी सोडतीतून ज्या मुलाचे नावे निघेल, त्या मुलीस मुलीबरोबर विवाह करावे लागले. पंचांनी चार चिठ्ठींवर चारही तरुणांची नावे लिहिल्यानंतर त्यांना कटोऱ्यात ठेवले. या दरम्यान, पंचांनी एका लहान मुलाला चिठ्ठी उचलण्यास सांगितले. तीन दिवसांपासून सुरू असलेला हा वाद चिठ्ठीने मिटला. ज्याचे नाव सोडतीत निघाले त्या मुलाबरोबर संबंधित मुलीचा विवाह ठरला. त्याच्याबरोबर विवाह लावून देण्यात आला.


Post a Comment

0 Comments