Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

श्रीनाथ काळे जिल्यात प्रथम तर काव्यवाचन स्पर्धेत कु.अस्मिता मराठे जिल्ह्यात द्वितीय

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
बोधेगाव - बालदिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन, प्रशिक्षण परिषद पुणे यांनी बालदिनाचे औचित्य साधतबालदिन सप्ताह निमीत्त आयोजित केलेल्या ऑनलाईन स्पर्धेत श्री शिवाजी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय बोधेगाव येथील इयत्ता १० वी तील विद्यार्थी श्रीनाथ काळे याने पोस्टर तयार करने स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम तर इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या कु अस्मिता राजेंद्र मराठे हिने बाल साहित्य ई समेलनातील काव्य वाचन स्पर्धेतुन जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. 

बालदिनाचे औचित्य साधत आयोजित केलेल्या स्पर्धेत दि. ८ नोव्हे ते १४ नोव्हेंबर या दरम्यान भाषण, पत्रलेखन, स्वलिखित काव्य वाचन, निबंध लेखन, पोस्टर करणे, नाट्यछटा एकपात्री, काव्य लेखन, व्हिडीओ तयार करणे, बाल साहित्य ई समेलन, इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये श्री शिवाजी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय बोधेगाव येथील इयत्ता १० वीत शिकत असलेल्या श्रीनाथ काळे या विद्यार्थ्याने 'स्वातंत्र्य संग्रामातील पंडित नेहरूचे योगदान' चे पोस्टर तयार करत नगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे तर इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या आणि आजपर्यंत इंद्रधनुष्य- काव्य संग्रह,न्याय मिळालाच पाहिजे -एकांकिका, आभाळमाया -कविता संग्रह तसेच प्रसिद्ध असे किशोर मासिक,अपेक्षा मासिक, अनेक दिवाळी अंक व वृतपत्रातुन काव्यलेखन करुन आकाशवाणी पुणे ,अहमदनगर, बीड.येथे कार्यक्रम आणि राज्यस्तरिय पारितोषिक मिळवलेल्या "आभाळमाया" काव्यसंग्रह ची लेखिका कु. अस्मिता मराठे हिने ई बाल साहित्य समेलनातील काव्य वाचन स्पर्धेत भाग घेतला, तीला 'चाचा नेहरू' या स्वरचित काव्य वाचनाला जिल्ह्यातुन द्वितिय क्रमांक मिळाला आहे. या यशासाठी शेवगावचे पं स. सभापती डाॅ. क्षितीज घुले पाटील,गटशिक्षण अधिकारी रामनाथ कराड, विस्तार अधिकारी श्रीमती शैलजा राउळ, केंद्र प्रमुख आर जी ढाकणे, श्री शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय आकोलकर, पर्यवेक्षक दशरथ पवार, शहाजी तांबे, ज्ञानदेव उंडे, कर्मचारी वृंद आणि परिसरातील ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. 

Post a Comment

0 Comments