Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मुंगूसच्या तावडीतून सर्पमित्राने वाचविला धामिनीचा जीव

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर -  नगर -औरंगाबाद रोडवरील शासकीय विश्रामगृहमध्ये ऐन उन्हाच्या कहरात मुंगूसाने एका धामिनीचा पाठलाग करत असताना झाडावर चढलेली धामिन जीव मुठीत धरून बसली होती हे दृश्य रवी सोनवणे यांनी बघितले त्यांनी लगेचच सर्पमित्र आकाश जाधव यांना हा प्रकार सांगितला.
  या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मुंगूसाला दूर केलं आणि झाडावर गेलेली धामिन खाली पाडून तिला पकडले यावेळी ऋषिकेश जाधव कुमार बनसोडे कृनाल भिंगारदिवे अमोल जाधव यांनी धामिनीला पुन्हा निसर्गात मुक्त केले.


  ऐन उन्हात धामिनीने काही तरी खाल्ल्याने व मुंगूस मागे लागल्या मुळे ती चवताळून सर्पमित्र टीमच्या अंगावर धावून येत होती पण तरीही10मिनिटात तिला पकडण्यासाठी लागले.     

Post a Comment

0 Comments