Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाथर्डीचे महेश भागवत यांची तेलंगणा राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी नियुक्ती

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- पाथर्डी तालुक्याचे रहिवासी असणारे  राचकोंडा आयुक्त महेश भागवत यांची तेलंगणा राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी नुकतीच नियुक्ती झाली आहे. 
पाथर्डीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा श्री भागवत यांच्या रुपाने मिळाला आहे. I.P.S म्हणून सुरवातीस मणिपूर व आंध्रप्रदेशात विविध ठिकाणच्या पोस्टिंग मध्ये आपल्या उत्कृष्ट कामाचा ठसा उमटवून लोकसेवक म्हणून समाजाभिमुख सेवा देवून विविध सेवा पदकांचे ते मानकरी ठरले. 
आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्यात काम करीत असताना नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी "अज्ञातम स्वेच्छा" प्रकल्प राबविला. पोलीस व नागरिकांच्या समन्वयासाठी "मैत्री संघम" निर्माण केला. नलगोंडा चे पोलीस अधीक्षक असताना यादगिरिगुट्टा येथील मानवी व्यापाराचे रॅकेट उघडकीस आणले. यातील पीडित महिला व मुलींच्या उत्कर्षासाठी स्वयं रोजगार, शिक्षण व त्यांना उपजीविकेचे साधन निर्माण करून दिले. तसेच महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समिती मध्येही त्यांनी उत्कृष्ट कार्य केले.
अशा अनेक व विशेष कार्याबद्दल त्यांना प्रेसिडेन्टस पोलीस मेडल फॉर गॅलन्ट्री (2004), पोलीस मेडल फॉर मेरीटोरियस सर्व्हिस (2011) व अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचा व ट्रॅफिकिंग इन पर्सन्स रिपोर्ट हिरोज अवार्ड (2017) असे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना सेवेत मिळाले.



Post a Comment

0 Comments