Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात टू प्लसमधील आरोपींना एसपी पाटील यांची तंबी ; पुन्हा गुन्हा घडल्यास थेट कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी (दि.20) टू प्लस मधील सर्व आरोपींची प्रत्यक्ष पाहणी करून पुन्हा गुन्हे केल्यास कारवाई केली जाईल, अशी तंबी सर्व उपस्थित आरोपींना जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिल्या. यावेळी भिंगार कॅम्पचे शिशिरकुमार देशमुख यांनी उपस्थित आरोपींची जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना माहिती दिली. श्री पाटील यांनी काही आरोपींना महिन्यातून एकदा भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगितले. या दरम्यान 40 ते 45 आरोपी यावेळी उपस्थित होते. नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे, भिंगार कॅम्पचे सपोनि शिशिरकुमार देशमुख आदिंसह भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments