Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सोशल मीडियाचा वापर जपून करण्याची गरज तर कौटुंबिक हिंसाचाराचा प्रतिबंध घरापासून करावा - रेवती देशपांडे

 

जिल्हा विधी सेवा प्राधीकरणामार्फत कायदेविषयक जनजागृती शिबीर
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर: विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर जपून करावा आणि कमी प्रमाणात करावा.  या माध्यमांचा योग्य वापर न झाल्यास नैराश्य आणि अधोगती यामधून मूळ ध्येयापासून भरकटण्याची शक्यता असते, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगरच्या सचिव रेवती देशपांडे यांनी केले. कौटुंबिक हिंसाचाराचा प्रतिबंध आपल्या घरापासुनच करावा तसेच समाजात वावरताना महिलांनी एकमेकांना आदर दयावा. दैनंदिन जीवनात सामाजिक बांधीलकीही जोपासावी, असे आवाहनही त्यांनी केले.

नुकताच महिला दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून २३ मार्च रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत अहमदनगर बार असोशिएशन व सेंट्ल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कौडेश्वर महाविद्यालय व जिल्हा प्राथमिक शाळा, पिंपळगांव कौडा येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्याबोलत होत्या.
यावेळी त्यांनी उपस्थितांना कौटुंबीक हिंसाचारापासुन महिलांचे संरक्षण कायदा व मनोधैर्य योजना या बाबत विस्तृत मार्गदर्शन केले. उच्चपदाचा वापर वैयक्तिक प्रसिध्दीसाठी न करता लोककल्याणसाठी करावा. आपल्याकडुन जेवढे होईल तेवढे दैनंदिन जीवनातही सामजिक कार्य करत रहावे व समाजाची जागृती करावी, असे आवाहन रेवती देशपांडे यांनी केले.  मनोधैर्य योजनेअंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष श्रीकांत ल. आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत १ कोटीपेक्षा अधिक रक्कम पिडीत ग्रस्तांना मंजुर केलेली आहे अशी माहिती दिली. तसेच त्यांनी कौडेश्वर विद्यालयाचे तंबाखूमुक्त अभियान राबविणेबाबत कौतुक केले. या  कार्यक्रमासाठी दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक पोपट पवार व सुनंदा ठोकळ तसेच शिक्षक, विद्यार्थी कोव्हीड १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करुन उपस्थित होते.
या जनजागृती शिबिरात अॅड. अनुराधा आठरे येवले पाटील यांनी विद्यार्थ्यांना हुंडा प्रतिबंधक कायदा त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी महिलांना लैगिंक अत्याचारापासुन संरक्षण कायदा याबाबत मार्गदर्शन केले. तसेच विद्याथ्यांना हुंडा देणार किंवा घेणार नाही असे शपथ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक पवार यांनी केले तसेच ठोकळ सुनंदा शाळेबाबत माहिती दिली. सुत्रसंचालन प्रविण शेरकर यांनी तर विकास कर्डीले यांनी आभार मानले. विद्यार्थीनीनी या प्रसंगी स्वागतगीत सादर केले. या कार्यक्रमासाठी कौडेश्वर विद्यालय व जिल्हा प्राथमिक शाळा पिंपळगाव कौडा येथील शिक्षकेतर कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.  


Post a Comment

0 Comments