Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अवैध दारू वाहतूक करणारा जेरबंद ; भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - शहरातील चांदणी चौक येथे अवैध विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यास भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून होंडा शाईन दुचाकी 50 हजार रुपये किमतीची व विदेशी दारू 10 हजार 620 रुपये रुपयांची असा एकूण 70 हजार 620 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ऋषिकेश लक्ष्मण बोरुडे (वय 21 रा. सारोळा बद्धी ता. नगर जि. अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्या सूचनेनुसार पोहेकाॅ गोविंद गोल्हार, पी.जी. पवार, ए.एन. नगरे, रमेश वराट, पोना राहुल द्वारके, संतोष अडसूळ, जी एस साठे, चापोकाँ अरुण मोरे, पोकाँ सागर तावरे, एम एम निमसे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments