Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चंदनाच्या झाडांची चोरी करणारे जेरबंद ; एलसीबीची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- कोपरगाव तालुक्यात चंदनाच्या झाडांची चोरी करणा-या सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. शितल उर्फ सिताराम ऊर्फ गणेश भानुदास कु-हाडे (वय 32), करण विजय कु-हाडे (वय 25, रा.चितळी स्टेशन, ता.राहाता), परमेश वैश्या भोसले (वय 26, भेंडोळा, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद), सतिष मच्छिंद्र शिंदे (वय 32, रा.चोभे काॅलनी, बोल्हेगाव, अहमदनगर), संतोष मारुती शिंदे ( वय 32), गणेश विष्णू गायकवाड (वय 26, रा.मोंढ्याचे मागे, गंगापूर, जि.औरंगाबाद) अशी पकडण्यात आलेली सहाजण आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, अहमदनगर शहर व जिल्ह्यात वारंवार चंदनाच्या झाडांच्या चोरी झाल्याच्या घटना घडल्या. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांनी चंदन चोरीचे गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमले होते. दरम्यान श्री कटके यांना खबऱ्याकडून खात्रीशीर माहिती मिळाली कि , काही इसम हे हुंडाई कंपणीचे काळे रंगाचे कारमधून चंदनाची लाकडे घेवून श्रीरामपूर - नेवासा रोडने चांदा गावचे दिशेने जात आहेत. या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ नगर - औरंगाबाद रोडवरील घोडेगांव येथील शनिशिंगणपूर चौक येथे जावून सापळा लावला. त्यानंतर काही वेळातच नेवासा फाटा दिशेकडून एक काळे रंगाची कार येत असल्याचे दिसल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर कार चालकास कार थांबविण्याचा इशारा करुन घेरावा घालून सदर कार व तीमध्ये असलेल्या इसमांना ताब्यात घेतले . त्यांना पोलीस स्टाफ व पंचाची ओळख सांगून त्यांना त्यांची पत्ते विचारली असता त्यांनी त्यांची नावे , पत्ते पोलिसांना त्यांनी सांगितले. पोलिसांनी चोरट्यांच्या कारचे झडतीचा उद्देश समाजावून सांगून पंचासमक्ष त्यांचे कारची झडती घेतली असता सदर कारमध्ये ४८ हजार रु . किं . चे अंदाजे १६ किलो वजनाची चंदनाची लाकडे मिळून आले. सदरची चंदनाची लाकडे तसेच ३ लाख रु . किं.ची हुंडाची कंपणीची कार (नं . एमएच १४, बीएम २०१०) असा एकूण ३ लाख ४८ हजार रु . किं . चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे . जप्त करण्यात आलेली चंदनाची लाकडे कोठून आणलेली आहेत व कोठे घेवून चालले आहेत याबाबत आरोपींना विश्वसात घेवून कसून चौकशी केली असता आरोपींनी सदरची चंदनाची लाकडे ही मागील सहा महिण्याचे कालावधीमध्ये कोल्हे वस्ती , कोपरगांव , एस्सार पेट्रोल पंप , बालिकाश्रम रोड , अ.नगर , धारणगाव , ता- कोपरगाव , वारी , ता- कोपरगांव या ठिकाणाहून चोरुन आणलेल्या चंदनाचे झाडांची लाकडे असून सदरचे चंदन बाळासाहेब हरिभाऊ गायकवाड ( रा . चांदा , ता नेवासा) यांस विक्री करण्यासाठी घेवून जात आहे असे सांगितले.
त्यानंतर आरोपींनी दिलेल्या माहितीवरुन कोपरगांव तालूका , तोफखाना पो.स्टे . येथील अभिलेखाची पाहणी करुन चंदन चोरीचे गुन्ह्यांची माहिती घेतली असता जप्त करण्यात आलेल्या चंदन चोरीचे प्रमाणे गुन्हे दाखल आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार पोसई गणेश इंगळे, पोहेकॉ दत्ता हिंगडे, सुनिल चव्हाण, बबन मखरे , पोना संदीप पवार, सुरेश माळी, पोकॉ जालिंदर माने, सागर ससाणे, पोकॉ शंकर चौधरी, पोना दीपक शिंदे, पोकॉ संदीप घोडके, चापोना चंदू कुसळकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे

Post a Comment

0 Comments