ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - जिल्ह्यात संघटीत गुन्हे करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार विश्वजीत रमेश कासार (रा. वाळकी ता.जि अहमदनगर) व त्याच्या टोळीतील आठ असे एकूण 9 जणांवर मोक्कांतर्गत जिल्हा पोलिस प्रशासनाने कारवाई केली आहे. पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर उर्वरित चारजण फरार आहेत.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे अहमदनगर जिल्हा पोलिस प्रशासनाने गंभीर गुन्ह्यातील विश्वजीत कासार याच्यासह त्याच्या टोळीतील सदस्यांवर मोक्काअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव दाखल केला होता. त्या प्रस्तावास दि. 11 मार्च 2021 ला मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वीच विश्वजीत रमेश कासार, इंद्रजीत रमेश कासार, मयूर बाबासाहेब नाईक (सर्व रा.वाळकी ता. जि.अहमदनगर), संतोष भाऊसाहेब धोत्रे (रा. कारगाव ता. शिरूर जि. पुणे), भरत भिमाजी पवार (रा. साकत, दहिगाव ता. जि. अहमदनगर) या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित टोळीतील सुनील फक्कड आडसरे (रा. शेडाळा, ता. आष्टी जि. बीड), शुभम बाळासाहेब लोखंडे (रा. करडे ता. शिरूर जि. पुणे), सचिन भांबरे (रा. खेतमाळीसवाडी पारगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर), संकेत भाऊसाहेब बालसिंग (रा. वाळकी ता. जि. अहमदनगर) आदी चारजण फरार आहेत. या गुन्हेगारांवर 302, 326, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149, 120 (ब) कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. या सर्वांवर नगर तालुका, कोतवाली, सुपा, एमआयडीसी, कर्जत, पारनेर, जीआरपी अहमदनगर, मौजपुरी (जालना), शिवाजीनगर (जि. पुणे) पोलिस ठाण्यांतर्गत दाखलपात्र स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणा-या टोळीविरुद्ध आगामी काळात मोक्काअंतर्गत कारवाई करणार असल्याचे संकेत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहेत
0 Comments