ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - चोरीच्या एटीएम कार्डचा वापर करून एटीएममधील 18 हजार रुपयांची चोरी केल्याप्रकरणातील चोरट्याला मुद्देमालसह पकडण्यात भिंगार कॅम्प पोलिसांना यश आले आहे. आदिनाथ रावसाहेब कार्ले असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. 28/12/2020 रोजी फिर्यादी सौ.विजया बाळासाहेब गावखरे (रा . प्रीयदर्शनी शाळेसमोर,साईप्रसाद रो हौसींग सोसायटी, नगर पाथर्डी रोड) यांचे पतीचे एसबीआय बँकेचे एटीएम कार्ड अज्ञात चोरट्याने चोरून त्यामधून दि. 28/01/2021 रोजी चास (ता.जि.अहमदनगर) येथील माऊली कॉम्प्लेक्स येथून एटीएम मधून 18 हजार रू.काढून घेतले होते. या घटनेच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुर नं 04/2021 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपास पोहेकाँ जी.डी.गोल्हार यांना देण्यात आला होता. गुन्हयाचा तपास करीत असतांना, मिळालेल्या बातमी नुसार माहीती घेऊन संबंधित बँकेबरोबर पत्र व्यवहार करून मिळालेल्या डाटाचे तांत्रीक विश्लेषन करून आरोपीची माहीती घेऊन आरोपी निष्पन्न करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिस पथकाने दि. 27/02/2021 रोजी आदिनाथ रावसाहेब कार्ले (वय 24 रा. चास ता.जि.अहमदनगर) याला अटक करून त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, गुन्हा केल्याची त्याने कबुली दिली. त्याने चोरलेले एटीएम कार्ड व एटीएममधून काढलेले 18 हजार रू रोख रक्कम काढून दिली. तसेच आरोपी कार्ले याने चोरलेले एटीएम कार्ड काढून दिले.
जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी शिशिरकुमार देशमुख यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोहेकाँ गोविंद गोल्हार, पोहेकाँ रमेश वराट, पोना संतोष आडसुळ, पोना राहुल राजेंद्र द्वारके, चापोकाँ अरूण मोरे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
0 Comments