Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीतील दोघे अटक ; एलसीबीची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - राहाता तालुक्यातील वाकडी ते गोटेवाडी जाणाऱ्या रस्त्यावर पाटाच्या बाजूला हडोळा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील दोघांना पकडले आहे. शुभम अनिल काळे (वय 21 रा. गणेशनगर ता. राहाता), भरत उर्फ भ-या तात्याजी काळे (वय 22 रा. सप्तशृंगी मंदिराशेजारी गणेशनगर ता. राहाता) अशी पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, खब-या मार्फत सराईत गुन्हेगार शुभम काळे हा त्याच्या साथीदारांसह वाकडी (ता. राहाता) शिवारात गोटेवाडी जाणार्‍या रस्त्याला पाटाच्या बाजूला पत्रा शेडच्या ओडशाला दरोडा घालण्याच्या तयारीत थांबला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यानुसार श्री कटके यांनी पोलीस पथकाला सूचना देऊन हडोळा परिसरात पोलिसांनी सापळा लावून सर्वांनी गोलाकर घेरावा घालून अचानक छापा टाकला. या छाप्या दरम्यान अंधाराचा फायदा घेऊन चारजण पळून गेली. यात शुभम काळे, भरत काळे या दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. या दोघांकडे अधिक चौकशी केली असता आनंद अनिल काळे, अक्षय यशवंत आव्हाड, गणेश भिकाजी तेलोरे (तिघे रा. गणेशनगर ता. राहाता), राहुल वाघमारे (रा. रांजणगाव ता. राहाता) ही पळून गेलेल्यांची नावे पकडण्यात आलेल्यांनी सांगितली. पकडण्यात आलेल्या दोघांकडून एक विना नंबर रॉयल इन्फिल्ड कंपनीची क्लासिक बुलेट, बजाज कंपनीची पल्सर दुचाकी, एक तलवार, एक गलोला, मोबाईल, मिरचीपूड असा एकूण 71 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोना संतोष लोढे यांच्याफिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात भादवि कलम 399, 402 सह आर्म ॲक्ट कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पकडण्यात आलेल्या आलेल्यांनी नेवासा, वाळुंज एमआयडीसी (जि. औरंगाबाद) व पोलिस ठाणेहद्दीत चोरी केल्याची कबुली दिली. शुभम काळे यांच्यावर राहाता, लोणी, श्रीरामपूर, नेवासा, वाळूज, एमआयडीसी सिन्नर, एमआयडिसी चांदवड (जि. नाशिक), सातारा (जि. औरंगाबाद) या पोलिस ठाण्यात तर भरत काळे याच्यावर पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक), कोपरगाव, शिर्डी, कोतवाली, निफाड (जि. नाशिक), सातारा खंडोबा (जि. औरंगाबाद), नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे व श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या सूचनेनुसार सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई गणेश इंगळे, पोना संतोष लोढे, शंकर चौधरी, पोकाँ प्रकाश वाघ, संदीप दरंदले, विनोद मासळकर, राहुल सोळुंके, रोहित मिसाळ संभाजी कोतकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली

Post a Comment

0 Comments