Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जबरी चोरीतील सराईत गुन्हेगार अटक ; एलसीबी व नगर तालुका पोलिसांची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - घोसपुरी येथील महिलेच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने ओरबडून चोरून नेणारा सराईत गुन्हेगारास पकडण्यात एलसीबी व नगर तालुका पोलिसांच्या संयुक्त पथकाला यश आले आहे. पप्पू परसराम काळे (रा. वडगाव गुप्ता ता.जि अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की नगर तालुका पोलिस ठाण्यात जबरी चोरी प्रकरणी दाखल गुन्ह्यातील तपासादरम्यान नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता याठिकाणी एलसीबी व नगर तालुका पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन राबवून फरार चोरटा पप्पू काळे याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी आरोपी काळे याने सदरचा गुन्हा भगवान ईश्वर भोसले व इतर दोन साथीदारांनी मिळून केल्याची कबुली दिली. आरोपी काळे याच्याकडून एक सोन्याचे मणीमंगळसूत्र, 120 मणी दोन पत्ते व दोन कर्णफुले असा 50 हजार रुपयांचा व दोन होंडा दुचाकी एक लाख रुपये किमतीच्या आणि लोखंडी कटावणी असा मुद्देमाल जप्त केला. आरोपी काळे याला न्यायालयात हजर केले असता दि. 20 मार्च रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस ठाण्याचे राजेंद्र सानप, पोउनि डी आर जारवाल, पोहेकाॅ सुनील चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकाँ दत्ता हिंगडे, बबन मखरे, पोकाॅ प्रकाश वाघ, अण्णा पवार, संभाजी बोराडे आदींच्या संयुक्त पथकाने कारवाई केली.

Post a Comment

0 Comments