Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नवरा, सासू व सास-यावर गुन्हा दाखलऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- मुलीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा नवरा, सासू व सास-या या तिघांविरुध्द नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेले याप्रमाणे दादा रामा झिटे (नवरा), इंद्राबाई रामा झिटे (सासू) व रामा झिटे (सासरे) अशी नावे आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील सोनेवाडी येथील मयत मुलगीवर संशय घेऊन तिला उपाशीपोटी ठेवून तिला वेळोवेळी मारहाण केली. तसेच तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे, या महादू नाथाभाऊ कोकरे ( रा. बाबुर्डी ता. बारामती जि. पुणे) यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात भादवि कलम 306,34 प्रमाणे दादा रामा झिटे (नवरा), इंद्राबाई रामा झिटे (सासू) व रामा झिटे (सासरे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई राऊत हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments