Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दिल्लीगेट रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत शिवसेनेने अधिकाऱ्यांना धरले धारेवर ; उद्यापासून काम सुरू करण्याचे ठेकेदाराने दिले आश्वासन

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : नगर शहरातील खड्डेमय रस्त्यावर वारंवार अपघात होत असल्याने यामुळे अपघात होतात. आणि ते नगरकरांच्या जीवावर बेततात याला सर्वस्वी मनपा अधिकारी , सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार जबाबदार आहेत त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी शिवसेनेने सर्वांना चांगलेच धारेवर धरले.  तोफखाना पोलीस ठाण्यात  युवा सेना प्रमुख  विक्रम राठोड, उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव, माजी महापौर अभिषेक कळमकर उपस्थित होते. 
त्यांनी पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्यासमोर पालिका , पी डब्ल डी चे  अधिकारी , आणि ठेकेदार रसिक कोठारी यांना जाब विचारला. शहरातील रस्त्यांची अवस्था खूपच  दयनीय झाली आहे . त्यात दिल्लीगेट रस्ता तर ठेकेदाराने रस्त्याचे काम अपूर्ण ठेवला . त्यामुळे रस्तावर वारंवार वाहतुकीची कोंडी होते. अपघात होतात. सर्व रस्त्यावर खड्डे, धूर व धुळीचे साम्राज्य असते . यामुळे सामान्य वाहनचालकांना रस्त्यावरून आपली वाहने चालविणे अवघड झाले आहे . या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने वारंवार आंदोलने केली मात्र त्याची पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने कधीच दखल घेतली नाही त्यामुळे अधिकारी तसेच ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी थेट तोफखाना पोलीस ठाणे गाठले. 
दिल्लीगेट रस्त्याचे काम का रखडले . नगर शहरात वारंवार होत असलेल्या वाहतुकीच्या कोंडीला जबाबदार कोण असा जाब त्यांनी विचारला . या सर्वावर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. 
यावेळी पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी मध्यस्थी करीत पालिका अधिकारी निबाळकर, बांधकाम खात्याचे भोसले व चव्हाण तसेच ठेकेदार रसिक कोठारी यांना तात्काळ बोलावून घेतले . 
ठेकदर कोठारी यांनी दिल्लीगेट रस्त्यांचे काम विनाविलंब उद्यापासून सुरु करण्याचे आश्वासन दिले . अधिकाऱ्यांनी देखील रखडलेली कामे लगेच मार्गी लावण्यात येतील असे सांगितले . 


Post a Comment

0 Comments