Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आरोपी बाळ बोठेला पकडण्यात मदत करणाऱ्या हैद्राबाद पोलिसांचा अहमदनगर एसपी मनोज पाटील यांनी प्रशस्तीपञक देऊन केला विशेष गौरव

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याला पकडण्याकामी विशेष मदत केल्याने अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी हैद्राबाद पोलिस पथकातील पोलिस कर्मचारी यांना प्रशस्तीपञक देऊन त्यांचा विशेष गौरव करण्यात आला आहे. हैैद्राबाद  अपर पोलीस महासंचालक स्वाती लकार व पोलीस उपमहानिरीक्षक श्रीमती सुमती यांच्या प्रमुख उपस्थितीत हैद्राबाद पोलिस पथकातील पोलिस कर्मचा-यांना  प्रशस्तीपत्रक देऊन विशेष गौरव करण्यात आला आहे.


रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठे हा  हैैद्राबाद (राज्य  तेलंंगण) येथील बिलालनगर दाटवस्तीत लपून बसला होता. ही माहिती अहमदनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार नगर पोलिसांनी हैद्राबाद स्थानिक पोलिसांची मदत घेतली. आरोपी बोठे याला पकडण्यात हैद्राबाद  पोलीस दलातील पोलीस निरीक्षक आर रवींद्र, पोलीस उपनिरीक्षक ही हरीष, पोलीस कर्मचारी यु रवी, एम मधु, जी रविकुमार, के आर संध्यारेखा, के सुनीता, चि सैदुलू या कर्मचाऱ्यांना अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रशस्तीपञक पाठवून गौरव करण्यात आला आहे.
  

Post a Comment

0 Comments