Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पंचायत समितीचे सभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे यांच्या हस्ते संभाजी मुंडे यांची टीव्ही-९ मराठीच्या तालुका प्रतिनिधीपदी निवडीबद्दल सत्कार

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
परळी वैजनाथ :- टिव्ही-९ मराठी या अग्रगण्य अशा वृत्तवाहीनीच्या परळी व अंबाजोगाई तालुका प्रतिनिधीपदी पत्रकार संभाजी मुंडे यांची नियुक्तीबद्दल परळी पंचायत समितीचे सभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे यांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. 
शहरातील पंचायत समिती येथे आज दि.13 मार्च रोजी पंचायत समितीचे सभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे यांच्या हस्ते संभाजी मुंडे यांची टीव्ही-९ मराठीच्या तालुका प्रतिनिधीपदी निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. पत्रकार संभाजी मुंडे हे गेल्या अनेक वर्षांपासून ईलेक्ट्रॉनिक मीडियाशी संबंधीत बातमीदार म्हणून सर्वपरिचित आहेत. मागील काळातील त्यांच्या कामाची विशेष दखल घेत टिव्ही-९ मराठी या सुप्रसिध्द मराठी वृत्तवाहिनीने त्यांना अंबाजोगाई आणि परळीचे तालुका प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. संभाजी मुंडे यांच्या निवडीबद्दल परळी पंचायत समितीचे सभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच निवडीबद्दल त्यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी प्रा.लक्ष्मण मुंडे सर, विष्णू मुंडे, प्रकाश गित्ते, जिवन सातभाई, अशोक आघाव हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments