Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर जिल्हा रुग्णालयांतर्गत कामकाजाचा शहर पोलिसांवर ताण ; एसपी साहेबांच्या निर्णयाकडे कर्मचा-यांचे लक्ष !ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- जिल्ह्यातील पोलिस ठाणे अंतर्गत अथवा आष्टी (जि. बीड) येथे झालेल्या घटनांमधील किंवा गुन्ह्यातील संबंधित अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले असता, या सर्वांच्या जबाबांसह कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठीच्या कामाचा ताण हा कोतवाली, तोफखाना, भिंगार, नगर तालुका आणि एमआयडीसी पोलिस कर्मचाऱ्यांवर येतो. वास्तविक नगर जिल्हा रुग्णालय हे तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत येते. त्यामुळे जिल्हा रुग्णालय अंतर्गत पोलीस यंत्रणेच्या कामकाजासाठी एकमेव तोफखाना पोलीस ठाणे अंतर्गतच 'फिक्स पॉईंट' पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी नियुक्त व्हावा. यामुळे उर्वरित नगर शहरातील पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांवर जिल्हा रुग्णालय कामकाजाचा ताण राहणार नसल्याचे पोलीस कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जिल्हा रुग्णालयातील पोलिसांच्या कामकाजाचा आढावा घेऊन शहर पोलिस ठाणे अंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांचा ताण दूर व्हावा, अशी अपेक्षा अपवाद पोलीस कर्मचाऱ्यांनी 'नगर रिपोर्टर'कडे मांडली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस ठाणे, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात घडलेल्या अपघातातील जखमी झालेल्याची कागदोपत्र तयार करणे यासह जिल्ह्यातील घडलेल्या गुन्ह्यातील आरोपी अनेक वेळा अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात येतात. या सर्वांची जबाबदारी म्हणजेच अन्य पोलिस ठाणे अंतर्गत रुग्णालयात दाखल झालेल्यांचा जबाबासह अन्य कागदपत्रांची पूर्तता करून तो अहवाल वरिष्ठांना देण्याच्या संदर्भात येणाऱ्या कामकाजाचा ताण अहमदनगर शहरातील कोतवाली, तोफखाना, भिंगार, एमआयडीसी अथवा नगर तालुका पोलिसांवर येतो. ही बाब काही पोलिस कर्मचाऱ्यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांसमोर मांडली आहे. परंतु याबाबत अद्यापही काही नियोजन झालेले नाही. यामुळे नगर शहरातील पोलिस कर्मचाऱ्यांची ही समस्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या समस्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी कायमस्वरूपी नियोजन केल्यास जिल्हा रुग्णालयातील शहर पोलिस कर्मचाऱ्यांच्या कामाचा ताण दूर होऊ शकतो. यापूर्वीच शहर पोलिस ठाणे अंतर्गत पोलिस कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आहे. यात वाढते गुन्हे, त्याचा तपास तसेच न्यायालयीन कामकाजात पोलीस कर्मचारी गुंतून पडत आहे. यात बाहेरील पोलिस ठाणेतंर्गत कामकाजाचा हा ताण पडत असल्याने शहर पोलीस ठाण्यातील कामकाजावर परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत. आता याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक काय निर्णय घेतात याकडे शहर पोलिस कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.Post a Comment

0 Comments