ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- दुचाकी चोरण्यास पारनेर तालुक्यात जेरबंद करण्यात नगर तालुका पोलिसांना यश आले आहे. राहुल जयसिंग थोरात ( रा.पिंपळगाव गवळी) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.12 जानेवारी 2021 रोजी रात्री 8 वा च्या सुमारास गतिशील हॉटेल समोरून 1 बजाज पल्सर मोसा चोरीस गेली होती याबाबत गुरन 28/21 भादविक 379 प्रमाणे नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मोटारसायकल चोरणारा आरोपी राहुल जयसिंग थोरात (रा.पिंपळी गवळी) यास पारनेर तालुक्यामधून अटक करण्यात आली असून, चोरी केलेली 70 हजार रु किमतीची बजाज पल्सर मोटर सायकल जप्त करण्यात आली आहे. नगर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि सानप यांच्या सूचनेनुसार शेख, गांगर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे .

0 Comments