Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कत्तलखान्यात आणलेल्या 38 गायीची सुटका ; नगर तालुका पोलिसांची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- नगर तालुक्यातील वाळकी येथे कत्तल करण्यासाठी आणलेल्या 11 लाख 28 हजार रुपये किमतीच्या "38" लहान मोठ्या गाई ताब्यात, एक 5 लाख रुपये किमतीची पीक अप टेम्पो जप्त, 1 आरोपी अटकेत, 3 आरोपीविरोधात गुन्हा दाखल,ताब्यात घेतलेल्या गाईंची माऊली कृपा गोशाळा येथे सुखरूप रवानगी केली. ही कारवाई  नगर तालुका पोलिसांनी केली आहे.

वाळकी येथे तोसिफ शेख हा इसम गाई कत्तलीसाठी येणार असल्याची माहिती तालुका पो ठानेचे सपोनि राजेंद्र सानप याना मिळाली त्यानुसार वाळकी सापळा रचून 1 महिंद्रा पीक अप टेम्पो ताब्यात घेण्यात आला. त्यामध्ये गोवंश 06 जनावरे आढळून आलेने तोसिफ कडे अधिक चोकशी केली असता त्याने सदर च्या गाई या झेंडिगेट येथे कत्तल करण्याकरिता घेऊन जात असलेने सांगितले. वाळकी धोंडेवाडी रोडवर अखिल कुरेशी याचे शेतातून सदरची जनावरे आणली असल्याचे सांगितले. त्यानुसार सपोनि राजेंद्र सानप, पीएसआय जारवाल, राऊत, हेकाँ अबनावे, पोना मरकड, पोकाॅ भालसिंग, पोना खेडकर, चापोकाॅ पालवे, तोरडमल आदिंच्या पथकाने छापा टाकला. यावेळी त्याचे शेताचे बाजूस झाडाझुडपात 20 गाई लपवून बांधल्याचा आढळून आल्या,तसेच मोसीन कुरेशी याचे वाळकी येथे प्लॉटवर दाटीवाटीने ठेवलेल्या 12 गाई आढळून आल्या सदर सर्व 38 गाई ताब्यात घेऊन माऊली कृपा गोशाळा येथे पाठवणेत आल्या आहेत व तोसिफ शेख,अखिल कुरेशी,मोसीन कुरेशी ( रा झेंडिगेट,अहमदनगर) यांचेवर गुन्हा दाखल करणेत आला आहे. 11 लाख 28 हजार किंमतीच्या गाई व 5 लाख किमतीचे पिकअप वाहन असे 16 लाख 28 हजार किमतीचा मुद्देमाल वाळकी (ता.नगर) येथून नगर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी सपोनि राजेंद्र सानप यांच्या सूचनेनुसार पथकातील पीएसआय धनराज जारवाल, रितेश राऊत, हेकाँ अबनावे, पोना मरकड, पोकाॅ भालसिंग, पोना खेडकर,चाहेकाॅ पालवे, तोरडमल आदिंनी ही कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments