Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर नगर तालुका पोलिसांची कारवाई ; 33 लाखांचा मुद्देमालासह तिघे अटक

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- नगर तालुक्यातील हातवळण गावाच्या शिवारात सीनानदी पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा हा जेसीबीच्या साह्याने बुधवारी (दि. 24) पहाटे 3 च्या सुमारास करत असताना चार जणांवर नगर तालुका पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत एकजण फरार झाला असून पोलिसांनी 33 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बंडू शिवाजी आजबे (वय 30, रा. शिराळ ता. आष्टी जि. बीड), नंदकुमार देवराम अजबे (वय 40 रा. शिराळ ता. आष्टी जि. बीड), रमेश बाळासाहेब घोडके (वय 27, रा. पारोडी, ता. आष्टी, जि. बीड) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे असून सागर बाळासाहेब घोडके (रा.पारोडी ता. आष्टी जि. बीड) हा एकमेव फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
20 लाख रुपये किमतीचा विना नंबर जेसीबी, 7 लाख रुपयाचा स्वराज कंपनीचा विना नंबर ट्रॅक्टर व ट्रॉली, 6 लाख रुपयाचा सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर एमएच 23, एएसओ 0926) व ट्रॉली (डी 1745) असा एकूण 33 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोना. भानुदास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून चौघांवर नगर तालुका पोलिस ठाण्यात भादवि कलम 379 सह पर्यावरण कायदा कलम 3, 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि सानप यांच्या सूचनेनुसार सफौ डी वाय लबडे, पोहेकाॅ बी एस गांगर्डे, पोना भानुदास सोनवणे आदिंसह पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

Post a Comment

0 Comments