Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

एसीबीचे पथक पहाताच, 20 लाखांच्या नोटा जाळल्या !

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
जयपूर : राजस्थानमध्ये दर दुसऱ्या दिवशी भ्रष्ट अधिकाऱ्यांना पकडण्याचं सत्र सुरुच आहे. तरीही भ्रष्टाचाराची प्रकरणं थांबायला तयार नाहीत. राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील पिंडो बारात तहसीलचे तहसीलदार यांनी तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना पाहून दरवाजा बंद केला आणि तब्बल 20 लाख रुपये गॅसवर जाळण्याचा प्रयत्न केला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दरवाजा तोडून अर्ध्या जळालेल्या नोटांसह तहसीलदार कल्पेश कुमार जैनला अटक केली. एसीबीला तक्रार मिळाली होती की तहसीलदार आपल्या राजस्व निरीक्षक पिण्डवाडाच्या माध्यमातून तिथे होणाऱ्या आवळा उत्पादनाच्या आवळा सालीच्या करारासाठी 1 लाख रुपयांची लाच मागत होते.
सूचना मिळाल्यावर पाली येथून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टीम पाठवली आणि तिथे 1 लाख रुपयांची लाच घेताना राजस्व निरीक्षक परबत सिंह यांना अटक केली. परबत सिंह यांनी सांगितलं की हा पैसा ते तहसीलदार कल्पेश कुमार जैन यांच्यासाठी घेत आहेत. त्यानंतर परबत सिंह यांना घेऊन एसीबी तहसीलदार कल्पेश कुमार जैन यांच्या घरी पोहोचली.
एसीबी येताच तहसीलदार कल्पेश कुमार जैन यांनी दार बंद केलं आणि नोटा आगीच्या हवाले केल्या. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घरातून निघणारा धूर पाहिला आणि दार तोडून घराच्या आत घुसले. जवळपास 20 लाख रुपयांपेक्षा जास्तच्या नोटा जळाल्या होत्या, तरी यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या घरुन 1 लाख 60 हजार रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत.
तहसीलदार कल्पेश कुमार जैन यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या इतर संपत्तीचा तपास सुरु आहे. तसेच, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तहसीलदार कल्पेश कुमार जैन यांची कसून चौकशी करत आहेत.Post a Comment

0 Comments