Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

15 लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी दोघांना अटक ; नगर तालुका पोलिसांची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- 15 लाखाची खंडणी माघणा-या दोघा खंडणी बहाद्दरांना अटक करण्यात नगर तालुका पोलिसांना यश आले आहे. कुलदीप कासार, सोनू गुंड (दोघ. रा.वाळकी ता जि अहमदनगर ) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, वेळोवेळी 15 लाख रुपयांची खंडणी मागितली व तुम्ही जर खंडणी दिली नाही तर तुम्हाला सागर आमच्या घरातील सर्वांना उचलून नेऊन जीवे ठार मारून टाकीन अशी फोनवरून व समोर येऊन धमकी देत असे, या फिर्यादीवरून कुलदीप रुपचंद कासार, अशोक उर्फ सोनू विठ्ठल गुंड या दोघांविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा रजि.नं 92/2021 भादंविक 384,386,120 b, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आले आहे. उर्वरित आरोपी विश्वजित रमेश कासार व मयूर बापूसाहेब नाईक हे दोघे यापूर्वीच न्यायालयीन कोठडीत आहेत.
Post a Comment

0 Comments