Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

घरफोडी करणारा व चोरीचे सोने घेणारा जेरबंद, 14 लाखाचा मुद्देमाल जप्त ; नगर एलसीबीची महत्त्वपूर्ण कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - ग्रामीण भागात दिवसा व रात्री बंद घरे फोडून चोरी करणारा अट्टल गुन्हेगार व चोरीचे सोने विकत घेणारा असे दोघांना पकडण्यात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या कारवाईत 5 घरफोडी चोऱ्या, एक जबरी चोरी असे एकूण 6 गुन्हे उघडकीस आणून 25 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने दोन वाहने व दोन मोबाईल असा एकूण 14 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दोन महिन्यापूर्वी नगर तालुका पोलीस ठाण्यात हद्दीत चोरीच्या घटनेबाबत दाखल गुन्हा हा भगवान ईश्वर भोसले (रा. बेलगाव ता. कर्जत) याने व त्याचे साथीदार यांनी मिळून केला आहे. भगवान ईश्वर भोसले व त्याचा भाऊ संदीप ईश्वर भोसले असे दोघे दुचाकीवरून चोरीचे सोने विक्री करण्यासाठी शिरूर कासार (जि. बीड) येथील सोनाराकडे येणार असल्याचे खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यानुसार पथकाला श्री कटके यांनी सूचना दिल्या. पोलिस पथकाने कडा ते शिरूर कासार रस्त्यावर सापळा लावला, त्यानंतर काही वेळातच भगवान भोसले व त्याचा भाऊ संदीप भोसले हे दोघे दुचाकीवरून शिरूरच्या दिशेने येताना दिसले. पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेण्यासाठी घेराव घातला असता, संदीप भोसले हा दुचाकी जागीच सोडून पळून गेला. त्याचा पाठलाग केला परंतु तो पोलिसांना मिळून आला नाही. आरोपी भगवान ईश्वर भोसले याला मोठ्या शताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याला पोलिसांनी विचारले असता प्रारंभी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिस खाक्यात दाखविताच, दोन पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली. यात 4 लाख 56 हजार रुपये किमतीचे अंदाजे 9 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि 1 लाख 25 हजार रुपये किं. होंडा कंपनीची स्पोर्ट बाईक व एक लाख रुपयाची होंडा शाइन दुचाकी, 20 हजार रुपये दोन मोबाईल असा एकूण 7 लाख 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पंधरा दिवसापूर्वी भाऊ संदीप ईश्वर भोसले, मिलान ईश्वर भोसले, अटल्या ईश्वर भोसले व मटक ईश्वरा भोसले (सर्व रा. बेलगाव ता. कर्जत) यांनी मिळून नगर शिवारातील निंबळकरोडवर बंद बंगला दिवसा फोडून दागिने चोरून आणल्याचे सांगितले. आरोपीला विश्वासात घेऊन यापूर्वी कोठे कोठे चोऱ्या केल्या आहेत. याबाबत विचारणा केली असता, त्यांनी दोन महिन्याच्या कालावधीत नगर तालुका, एमआयडिसी व पारनेर पोलीस ठाणे हद्दीत दिवसा-रात्री घरफोड्या करून सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर चोरलेला दागिने बाबत आरोपीकडे विचारपूस केली असता चोरीचे सोने हे शिरूर कासार (जि. बीड) येथील गणेश ज्वेलर्स या दुकानांमध्ये विकले असल्याचे सांगून दुकान दाखवले. यानंतर पोलिसांनी रामा अभिमन्यू इंगळे (वय 33 रा. पाडळी ता. शिरूर कासार जि. बीड) यांना पोलिसांनी विश्वासात घेऊन आरोपी भगवान विश्वर भोसले यांनी व त्यांच्या साथीदारांनी विकलेल्या सोन्याच्या दागिन्यांबाबत कसून चौकशी केली, यात आरोपी भगवान भोसले यांच्याकडून सोन्याचे दागिने विकत घेतले असल्याचे सांगून दागिने समक्ष हजर केले. 7 लाख 60 हजार रुपये किमतीचे 16 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करून दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी भगवान भोसले व त्याच्या साथीदारांनी नगर तालुका, एमआयडिसी, पारनेर हद्दीत चोऱ्या केल्याचे निष्पन्न झाल्या आहेत. आरोपी भगवान भोसले याच्याविरुद्ध कर्जत, आष्टी (जि. बीड), सांगोला (जि. सोलापूर), कर्जत, श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या तपासादरम्यान 5 घरफोडी चोऱ्या, 1 जबरी चोरी असे एकूण 6 गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी 25 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, दोन वाहने व दोन मोबाईल असा एकूण 14 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना मुद्देमालासह नगर तालुका पोलिस ठाण्यात पुढील तपासासाठी ताब्यात देण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल खटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई गणेश इंगळे, पोना सुनील चव्हाण, पोहेकाँ दत्तात्रेय हिंगडे, बबन मखरे, अण्णा पवार, संदीप दरंदले, शंकर चौधरी, दीपक शिंदे, जालिंदर माने, चापोहेकाँ उमाकांत गावडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

Post a Comment

0 Comments