Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

घोड्यास टांग्यांना जुपून शर्यत लावून चाबुकाने क्रुरपणे मारहाण ; 13 जणांविरूद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- घोड्यास टांग्यांना जुपून शर्यत लावून ते शर्यतीत वेगाने पळावे, याकरीता त्यांना हातातील चाबुकाने क्रुरपणे मारहाण करुन निद्रयी वागणूक दिल्या प्रकरणी तसेच कोवीड 19 चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी रोग प्रतिबंधक कलमान्वये 13 ते 14 जणांविरूद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील हिंगणगाव फाटा, कल्याण रोड (ता. जि.अ नगर) येथे घोडा या प्राण्यास टांग्यांना जुपून शर्यत लावून ते शर्यतीत वेगाने पळावे, याकरीता त्यांना हातातील चाबुकाने क्रुरपणे मारहाण करुन निद्रयी वागणूक दिली. या पोना सचिन गायकवाड यांच्या फिर्यादीवरून जिल्हाधिकारी यांनी कोवीड 19 चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी रोग प्रतिबंधक कलम 188,269,270 सह प्राण्यांना क्रुरपणे वागण 1960 चे कलम 11(1) (क) प्रमाणे बंडु दंगु बडे, रावसाहेब दंगु बडे (दोघे रा. मेहकरी ता.जी अहमदनगर) व प्रकाश मच्छिंद्र पोटे (रा. बारदारी ता.जि.अ नगर) व इतर दुचाकीवरील 10 ते 12 जणांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोहेकॉ लाळगे हे करीत आहे.

Post a Comment

0 Comments