Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे यासह 11 जण निष्पन्न, 10 अटक

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे यासह 11 आरोपी निष्पन्न झाले असून 10 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. बोठे याला हैद्राबाद येथे पकडण्यात आले. बोठे, जनार्दन चंद्राप्पा, महेश तनपुरे यांना ताब्यात घेतले आहे. पी अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी हा आरोपी फरार आहे,अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पञकारांशी बोलताना दिली.दि.१३ मार्च २०२१ रोजी सुपा पोलीस स्टेशन गुरनं ४७८/२०२० भारतीय दंड विधान संहिता कलम ३०२,१२० (ब),२१२.३४ अन्वये दाखल गुन्हयाचे तपासात प्राप्त तांत्रीक पुराव्यावरुन गुन्हयातील आरोपी बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे (रा.बालिकाश्रम रोड कमलनयन हॉस्पिटल समोर, अहमदनगर ) हा फरार होता. 
आरोपी १) बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे (रा. बालीकाव्यम रोड, कमलनयन हॉस्पिटल समोर, अहमदनगर), २) जर्नादन अकला चंद्राण्या ( रा. १४-११३, फलट नं. ३०१, श्री.त्रियेनी निवास, रामनगर, पी अॅण्ड टी कॉलनी, सारोमानगर, रंगारेगो, हिदाचाद, तेलंगाना),३) पी अनंतलामी व्यंकटम सुब्याचारी (रा. हेद्राबाद, तेलगाना, फल), ४) राजशेखर अंजय थापाली (वय २५, रा मुडुर करीमनगर, मुस्ताचाद, आंध्रप्रदेश, (तेलंगाना), ५) शेख इस्माईल शेख अली, (वय ३०, रा. युवा कॉलनी, साईन नगर, बालापुर सहरनगर, रंगायो, आंध्रप्रदेश, (तेलंगाना), ६) अब्दुल रहमान अब्दुल आरोफ, (वय ५२, रा चारमीनार मसनीद, पहाड़ी शरीफ, सुरुर नगर, रंग के हो, आंध्रप्रदेश, (तेलंगाना), ७) महेश वसंतराव तनपुरे (वय ४०, रा. कुलस्वामीनी गजानन हौसिंग सोसायटी, नवले नगर, गुलमोहर रोड, सावेडी, अहमदनगर) यापैकी राजशेखर अंजय थापाल याला काल दि.१२ मार्च २०२१ रोजी अटक करून न्यायालयासमोर हजर केले. यानंतर त्याला पारनेर न्यायालयाने दि.१६ मार्च २०२१ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे. बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे, जर्नादन अकला चंद्राण्या व महेश वसंतराव तनपुरे यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे. आरोपी अनंतलामी व्यंकटम सुब्याचारी हा अद्याप फरार आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, 
अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण विभागाचे अजित पाटोल, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे अनिल कटके, यादव (कर्जत पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक), संभागी गायकवाड (जामखेड पोलीस स्टेशन), आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक गडकरी मॅडम, नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिधटे, तोफखानाचे पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोहेकाँ पांडे, पोना रविकिरण सोनटक्के, दिपक शिदे, राहुल गुंड, अभिजीत अरकल, जयश्री फुंदे, संतोष नाते, गणेश धुमाळ, भुजंग बड़े, सचिन बीर, सत्यम शिंदे, चौगुले, पारनेर, मिसाळ, रणजीत जाधव, दातीर, प्रकाश वाण, राहुल डोळसे, रितेश वेताळ आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments