Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पत्नीच्या अंगावर ऑसिड टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीस 10 वर्ष सक्तमजुरी

 ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
 
अहमदनगर- पत्नीच्या अंगावर ऑसिड टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीस दहा वर्ष सक्तमजुरी व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील मनिषा पी केळगंद्रे-शिंदे यांनी कामकाज पाहिले. खटल्याच्या सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी पोहेकाॅ मारुती ए थोरात यांनी सहकार्य केले.
फिर्यादी पिडितेस जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी आरोपी श्रीकांत आनंद मोरे (रा.प्रबुद्धनगर, आलमगीर, भिंगार, अहमदनगर) यास भादविक 307, 326अ, 341 प्रमाणे दोषी धरले. आरोपी मोरे याला भादवि कलम 307 प्रमाणे 10 सक्तमजुरी व 50 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद, भादवि कलम 341 प्रमाणे 1 महिना सक्तमजुरी व 500 रुपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. तसेच दंडाच्या रक्कमेपैकी 40 हजार रुपये पिडीतेस देण्याचा व उर्वरित दंड सरकार जमा करण्याचे आदेश न्यायालयाने पारीत केला आहे.Post a Comment

0 Comments