Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्ह्यातील सोसायटीच्या चांगल्या कारभारामुळे शेतकऱ्यांना मोठी कर्जमाफी : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

मांडवा विविधकार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : - विविध कार्यकारी सोसायटी या शेतकऱ्यांच्या कामधेनू आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम सोसायट्यांमार्फत केले जाते.
शेतकऱ्यांना शासनाकडून मोठ्या प्रमाणात कर्ज माफी होते. त्याचा लाभ सोसायट्यांचे सचिव व
पदधिकाऱ्यांनी केलेल्या कामामुळेच मिळतो मागील वर्षी केंद्र सरकारने नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे १५०0 कोटी रूपयांची कर्ज माफी केली. याचे सर्व श्रेय सोसायट्यांचे सचिव व पदाधिकाऱ्यांना जाते. त्यांनी केलेल्या कामामुळेच महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रक्कमेची कर्ज माफी झाली. मांडवा विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक सर्वाच्या सहकार्यातून बिनविरोध करून इतर सोसायट्यांसमोर एक आदर्श ठेवला. अशी प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
नगर तालुक्‍यातील मांडवा विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल संचालक मंडळाचा सत्कार करतांना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले समवेत संचालक बाळासाहेब
निमसे, पंढरीनाथ निमसे, ज्ञानेश्वर निमसे, पांडूरंग निमसे, शिवाजी निमसे, बाळासाहेब निमसे, ज्ञानदेव निमसे, गंगाधर निक्रड, महादेव निक्रड, सुरेखा दत्तात्रय निक्रड, छाया विलास निमसे, जनार्दन गांगुर्डे, संरपच सुभाष निमसे, ग्रामपंचायत सदस्य मिरा नरेंद्र निक्रड, दिलीप पांडूरंग निक्रड, बहिरू निमसे, अशोक निमसे, जया आबासाहेब निमसे, भाऊ मज्याबापू निमसे, निर्मला गंगाधर पंडित, आदी उपस्थित होते.
बाळासाहेब निमसे म्हणाले की, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली सोसायची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. शासनाचे योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे
काम आम्ही सर्वजण करू. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी ग्रामस्थानी सहकार्य केले.
सोसायटीच्या योजना शेतकऱ्याच्या घरपर्यंत घेऊन जाण्यासाठी काम करू असे ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments