Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नेवाशात पोनि खरे तर भिंगारला सपोनि देशमुख, एमआयडीसीला सपोनि आठरे, राजूरला सपोनि साबळे यांच्या नव्याने नियुक्त्या

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - जिल्ह्यातील चार पोलिस ठाण्यात नव्याने एक पोलीस निरीक्षक व 4 सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकाऱ्यांच्या  जिल्ह्यातंर्गत बदल्यांचे आदेश सोमवारी (दि.15) झालेल्या अहमदनगर जिल्हा पोलिस आस्थापना बैठकीत काढण्यात आले. यामध्ये पोलीस निरीक्षक विजय करे यांची नेवासा पोलीस ठाण्यात तर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सपोनि शिशिरकुमार देशमुख, नगर एमआयडीसी पोलिस ठाण्यात सपोनि युवराज आठरे आणि राजूर पोलीस ठाण्यात सपोनि नरेंद्र साबळे आदींच्या नियुक्त्या जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केल्या आहेत.


भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे तत्कालीन सपोनि प्रवीण पाटील यांनी 302 च्या प्रकरणात तपासकामी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले होते. यानंतर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पद रिक्त होते. त्याठिकाणी प्रभारी चार्ज नगर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांच्याकडे होता. परंतु आता या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि देशमुख यांची नियुक्ती झाली आहे. तर नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि मोहन बोरसे यांची थेट बदली अहमदनगर नियंत्रण कक्षात केली असून, त्यांच्या रिक्त जागी सपोनि युवराज आठरे यांची नियुक्ती झाली आहे. नेवासा पोलीस ठाण्यातील रिक्त पदी अहमदनगर नियंत्रण कक्षेतील पोलीस निरीक्षक विजय करे यांची नियुक्ती झाली आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे सपोनि नरेंद्र साबळे यांची राजुर पोलीस ठाण्यात नियुक्तीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पाटील यांनी काढले आहेत.
Post a Comment

0 Comments