Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाराष्ट्रात लग्न समारंभामध्ये चोरी करणारे मध्यप्रदेशातील आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- मध्यप्रदेश येथून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन लग्न समारंभा मधून रोख रक्कम व दागिने चोरी करणा-या 7 आरोपींना मध्यप्रदेश येथे जेरबंद करण्यात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गोलू उर्फ सुमेर सिसोदिया ( वय 25), संदीप सुमेरा जोरदार झोजा उर्फ सिसोदिया ( वय 19 मूळ रा. बडा पिपलीयाॅ जि. देवास, मध्यप्रदेश ह रा. बाजारपूर जैधपुर ज्ञानमंदिर गल्ली नं. 4 मकान नं. 380 न्यू दिल्ली), राधेश्याम उदयराम राजपूत उर्फ ठाकूर (वय 30 रा. अलीविहार ए 310 सरिताविहार दिल्ली), बिपीन राजपाल सिंग (वय 21 रा. लखपत कॉलनी, मिठापुर एक्टेंशन घर नं. 289, गल्ली नं. 4 नवीदिल्ली), गिरीराज दिनेशचंद्र शुक्ला (वय 25, रा.ए 978 /11 जैधपूर, पार्ट-2, बदापूर नवीदिल्ली), अनिल कमल सिसोदिया (वय 30 ह.रा. जैधपूर, ज्ञानमंदिर गल्ली नं. 4 मकान नं. 380 नवीदिल्ली, मूळ रा. बडा पिपलियाॅ, जि. देवास, मध्यप्रदेश), विशालकुमार बनी सिंग (वय19, रा.98 ए, राशननगर, अगवानपूर, हरियाणा) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. 
याबाबत समजलेली माहिती अशी की, शिर्डी येथे लग्न खर्चासाठी आणलेली 15 हजार रु.रक्कम असलेली बँग चोरी झालेल्याच्या शिर्डी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी हे मध्यप्रदेश राज्यातील असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. या माहितीनुसार श्री कटके यांनी आरोपींना शोधण्यासाठी स्वतंत्र पथके मध्यप्रदेशात पाठवली. पोलिस पथकांनी एकूण सात जणांना ताब्यात घेतले. त्याच्या कडून 55000 रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली 13 लाख रुपये किंमतीची हुंडाई कंपनीचे व्हेन्यू कार (नंबर एमपी9 सीसीएस 7450) व 9 लाख रुपये किंमतीची मारुती सुझुकी कंपनीची सफेद रंगाची बलेनो कार ( नं. एमपी 9 डब्ल्यूजी 5813), तसेच 78 हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे 6 मोबाईल असा एकूण 23 लाख 33 हजार रुपये किमतीचे वाहने व रोख रक्कम जप्त केली. पकडण्यात आलेला सर्व आरोपींना मुद्देमालासह पुढील तपाससाठी शिर्डी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे मॅडम, शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि मिथुन घुगे, पोसई गणेश इंगळे, सफौ सोन्याबापु नानेकर, पोहेकाँ दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, पोना संदीप पवार, सुनील चव्हाण, शंकर चौधरी, विशाल दळवी, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, पोकाॅ संदीप दरंदले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments