Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाण्याच्या योग्य नियोजनासाठी जनजागृती महत्वाची - संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी

 

भूजल योजनेच्या जनजागृती कार्यक्रम अभियानाचे उद्घाटन
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पुणे : गावातील पाणी अंदाज पत्रक तयार करताना आपणाला गावातील सर्व पिकांची माहिती, लागणारे पाणी किती लागते यांची सर्व माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करता येणे सहज शक्य आहे. त्यासाठी जनजागृती खूप महत्वाची आहे. पाणी क्षेत्रात अनेक व्यक्ती, विभाग काम करत आहेत. मात्र, आज तीन ते चार विभाग एकत्र येऊन जनजागृती करत आहे. विशेष: हा युवा वर्ग पुढे येऊन यामध्ये काम करत असल्याने निश्चितच पाण्याची बचत होईल, असे मत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केले.


भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, नेहरू युवा केंद्र आणि ग्रामीण तंत्रज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ``कॅच द रेन``आणि ``भूजल योजने``च्या जनजागृती कार्यक्रम अभियानाचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिसर्च पार्क फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद शाळीग्राम, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी यशवंत मानखेडकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोठे, भूजल विभागाचे सहसंचालक डॉ. मिलिंद देशपांडे, सी. टी. बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य काकासाहेब मोहिते, एनएसएसचे विभागीय संचालक डॉ. डी. कार्तिकेयन, ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष गिताराम कदम, संचालक शरद पाबळे उपस्थित होते.
श्री. कलशेट्टी म्हणाले, गावात पडणारा पाऊस व पिकांना लागणारे पाणी यांचे अंदाजपत्रक करणे काळाची गरज बनली आहे. ज्या गावांनी पाण्याचे अंदाजपत्रक केले आहे. त्या गावातील नागरिकांना चांगला फायदा झाला आहे. मात्र, ही संख्या मर्यादित असून प्रत्येक गावांनी पाण्याचे अंदाजपत्रक तयार करून त्यांच्या अंमलबजावणी साठी सर्व घटकांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे. भूजल वाढविण्यासाठी कॅच द रेन हा उपक्रम राबविला जात आहे. यामुळे भूजलसंबधी नागरिकांमध्ये जनजागृती होऊन पाणी पातळी उंचावण्यास मदत होईल. हे करत असताना पाण्याचे व्यवस्थापनही तेवढेच महत्वाचे आहे. भूजल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या अटल भूजल योजनेत कॅच द रेन पासून पाणी जिरविण्यासाठी लागणारे स्ट्रक्चरवर भर देण्यात येत आहे. पडलेल्या पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरले जाणार आहे. याशिवाय ठिंबक, तुषार सिंचन, मल्चिंग यांनाही प्रोत्साहन दिले जात आहे. त्यातून पाण्याची मोठी बचत होणार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिसर्च पार्क फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद शाळीग्राम म्हणाले , पाण्याची उपलब्धता खूप आहे. परंतु आवश्यक तिथे त्याचा अधिक प्रमाणात उपयोग होत नसून निरूपयोगी ठिकाणी पाण्याचा अधिक वापर होत आहे. मात्र, हे निरूपयोगी पाणीही शेतीसाठी वापरले जाते. याचा विचार करून पाण्याचा वापर केला पाहिजे. पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी पाणी अडवा, पाणी जिरवा असे अनेक उपक्रम राबविले जात असले तरी पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जिरवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष गिताराम कदम यांनी प्रास्तविक केले. तर एनएसएसचे विभागीय संचालक डॉ. डी. कार्तिकेयन यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments